Beetroot for Weight Loss : आपल्यापैकी अनेकांना बीट खायला आवडत नाही. बीटमध्ये अनेक पोषक तत्व असतात. अनेकजण बीटाचा वापर सॅलडमध्ये करतात. बीटमध्ये रक्त वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदेशीर गुणधर्म असतात. तसेच बीटमध्ये आयर्न आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे तुम्हाला फायदा होतो. याशिवाय हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येवरही बीटचे सेवन फायदेशीर मानले जाते. बीटरूट थंड कंदमूळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त बीट खाणे चांगले ठरते. बीटाचे असे अनेक फायदे आहेत. कोणते ते जाणून घ्या.
रिकाम्या पोटी बीटचा ज्यूस प्या
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला बीटचा जास्तीत जास्त पोषक तत्व हवे असतील तर, तुम्ही रिकाम्या पोटी बीटचा ज्यूस पिऊ शकता. तसेच, तुम्ही या ज्यूसमध्ये लिंबाचा रस आणि थोडेसे काळे मीठ घालून देखील पिऊ शकता. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. यासोबतच अॅनिमियामध्येही याचे सेवन फायदेशीर ठरेल. त्यामुळे त्वचेच्या समस्याही दूर होतात.
बीटापासून बनवलेला पराठा खा
बीट वापरण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही बीटापासून बनवलेला पराठा खाऊ शकता. यामुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळेल.
सॅलडमध्ये बीटाचा वापर करा
बीटाचे सेवन करण्याचा तिसरा आणि महत्वाचा मार्ग म्हणजे तुम्ही बीट सॅलडमध्ये देखील मिक्स करून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला अनेक जीवनसत्त्व मिळतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :