Health Tips : हिवाळ्यातील विशेष गोष्ट म्हणजे त्यात अनेक प्रकारच्या भाज्या बाजारात येतात. या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जसे गाजर, बीट आणि आवळा. या तिन्हींमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आपण ते सॅलड, सूप आणि ज्यू करूनही खाऊ किंवा पिऊ शकतो. पण, अनेकांना सॅलड खाणे फारसे आवडत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे त्या भाज्या मिक्स करून ज्यूस बनवून ते पिणे.


पचनासाठी फायदेशीर


गाजर, आवळा आणि बीट मिक्स करून रस बनवला तर ते पचनक्रिया योग्यरित्या चालवण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.


डिटॉक्समध्ये उपयुक्त


हा रस शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो. हिवाळ्यात लोक कमी पाणी पितात त्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत हा रस पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हे शरीर हायड्रेटेड ठेवेल आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करेल.


रक्ताची कमतरता पूर्ण करेल


जेव्हा आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असते तेव्हा बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यात लोह मुबलक प्रमाणात आढळते, जे अॅनिमियावर मात करण्यास मदत करते. याचे दररोज सेवन केल्याने लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढते.


वजन नियंत्रित होते


या ज्यूसमध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असते, तो नियमित प्यायल्याने शरीराचे वजन नियंत्रित ठेवता येते. जास्त फायबर असल्यामुळे पोट भरलेले वाटते. त्यामुळे भूकही लागत नाही.  


त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते


या तिन्ही भाज्यांच्या मिश्रणात व्हिटॅमिन सी, ए, के, बी आणि ई सारखे पोषक घटक असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात. याच्या सेवनाने त्वचा घट्ट आणि तरुण राहते.


हे निरोगी रस तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक 



  • सफरचंद, बीट, गाजर, आवळा, आले, पुदिना आणि काळे मीठ घ्या.

  • हे करण्यासाठी, प्रथम बीट आणि गाजर सोलून घ्या.

  • यानंतर, सफरचंद, बीट आणि गाजर चांगले धुवा आणि नंतर चिरून घ्या.

  • तुम्हाला हवे असल्यास चव वाढवण्यासाठी आवळा, आले, काळे मीठ आणि पुदिनाही टाकू शकता.

  • या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाका आणि त्यात थोडे पाणीही टाका.

  • त्यानंतर ते एका ग्लासमध्ये काढा, गाळून घ्या आणि निरोगी राहण्यासाठी प्या.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय