नागपूर : राज्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या (Education ) प्रवाहात आणण्यासाठी राज्यात 'शाळेत चला अभियान' राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Vasant Kesarkar) यांनी आज विधानसभेत दिली. शाळाबाह्य मुलांबाबतचा प्रश्न जयंत पाटील (jayant patil) यांनी प्रश्न विचारला होता. त्याला दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. 


दीपक केसरकर सभागृहात बोलताना म्हणाले की, 17 ऑगस्ट, 2023 ते 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यात 1624 मुले व 1590 मुली असे एकूण 3214 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. या सर्वेक्षणानुसार संपूर्ण मुंबईत एकूण 356 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. मुंबईतील ही सर्व 356 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यात 380 बालके शाळाबाहय आढळून आले असून त्यापैकी 297 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत, रायगडमध्ये 38 बालके शाळाबाहय आढळून आले असून ती सर्व बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. तर पालघर मध्ये 928 बालके शाळाबाहय आढळून आले.  सर्वेक्षणाच्या कालावधी मध्ये 71 बालके व सर्वेक्षणाच्या कालावधी नंतर 94 अशी एकूण 165 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. उर्वरीत 763 बालकांना देखील नजीकच्या शाळेत दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


राज्यात विशेषत: पालघर, ठाणे आणि बुलढाणा या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जाईल. शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण आणि नगरविकास विभागाच्या समन्वयातून शाळांची दुरुस्ती, शाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ आदी बाबींवर लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.       


शिक्षक भरती प्रक्रिया सुरू -


राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदूनामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.  या वेळी ॲड. आशिष शेलार, नाना पटोले, ॲड. यशोमती ठाकूर, योगेश सागर आणि बाळासाहेब थोरात यांनी उपप्रश्न विचारले.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI