Health Tips : ड्रायफ्रूट्स हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज मूठभर ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. यापैकीच एक म्हणजे काजू (Cashew). काजूचं सेवन केल्याने शरीरातील अनेक पोषक तत्वांची कमतरता दूर होते. या ड्रायफ्रूटमध्ये फायबर, प्रोटीन, मॅंगनीज, झिंक, कॉपर यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. पण, तुम्हाला माहीत आहे का कोरड्या काजूपेक्षा ओले काजू जास्त फायदेशीर असतात. जर तुम्ही दररोज भिजवलेले काजू खाल्ले तर तुम्ही अनेक आरोग्यविषयक आजारांपासून दूर राहू शकता. चला तर मग जाणून घेऊयात ओले काजू खाण्याचे फायदे.
निरोगी हृदयासाठी फायदेशीर
पोषक तत्वांनी समृद्ध असलेले काजू हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यात हेल्दी फॅट्स आढळतात. जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी भिजवलेले काजू खाल्ले तर ते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
दृष्टी सुधारण्यास उपयुक्त
काजूमुळे डोळे निरोगी राहण्यासही मदत होते. त्यात शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे रेटिनाचे संरक्षण करतात.
पचन सुधारते
भिजवलेले काजू खाल्ल्याने पचनक्रियाही सुधारते. यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे आतड्याची प्रक्रिया सुलभ होते. ओले काजू पचायलाही चांगले असतात, त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या टाळता येतात.
मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर
इतर ड्रायफ्रूट्सच्या तुलनेत काजूमध्ये हेल्दी फॅट्स आढळतात आणि त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाणही कमी असते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही काजू खाऊ शकता, यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहते.
त्वचेसाठी फायदेशीर
काजूमध्ये हेल्दी फॅट्स आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. याशिवाय त्वचेसाठी तुम्ही काजूच्या तेलाचा समावेश करू शकता. हे फायटोकेमिकल्स, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे. त्याच्या वापराने त्वचा निरोगी दिसते.
स्ट्रोक टाळण्यासाठी उपयुक्त
काजूमध्ये मॅग्नेशियम पुरेशा प्रमाणात आढळते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो. यासाठी तुम्ही नियमितपणे भिजवलेले काजू खाऊ शकता, ज्यामुळे पक्षाघातापासून बचाव होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :