Health Tips : प्रत्येक स्त्रीच्या स्वयंपाकघरात आढळणारी एक गोष्ट म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर अन्नाला चवदार आणि सुवासी बनवते. कोथिंबीरचा वापर आपण अन्नात अनेक प्रकारे करतो. जसे की, भाजीत कोथिंबीर वापरली जाते, सॅलडमध्ये वापर केला जातो. कोथिंबीरची चटणी केली जाते. शीतपेयात देखील कोथिंबीरचा वापर केला जातो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, कोथिंबीर फक्त अन्नाची चव वाढवत नाही तर कोथिंबीर आरोग्यासाठीही परिपूर्ण आहे. हे तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करते. कोथिंबिरीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. चला जाणून घेऊयात कोथिंबिरीचे फायदे.
रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते
अँटिऑक्सिडंटने समृद्ध कोथिंबीरच्या बिया अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करतात. या कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारचे इन्फेक्शन टाळू शकता.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर कोथिंबीरीचे पाणी तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात कोथिंबीर पाण्याचाही समावेश करू शकता. हे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने चयापचय वाढते. तुम्ही ते डिटॉक्स वॉटर म्हणून पिऊ शकता. हे पेय वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
डोळ्यांसाठी फायदेशीर
कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे दृष्टी सुधारते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही दररोज कोथिंबिरीचे पाणी पिऊ शकता.
केस मजबूत करते
कोथिंबीर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि इतर घटक आढळतात, ज्यामुळे केस मजबूत होतात. सकाळी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने केस गळणे आणि तुटणे कमी होते.
अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीरचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. आणि अनेक रोगांपासून आपली सुटका करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :