Health News : असं म्हणतात, पूर्वीच्या काळात ऋषीमुनी, साधू 100 किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष जगायचे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात खराब जीवनशैली, ताणतणाव, जगभर तंत्रज्ञानाचा प्रसार होत असल्याने लोकांना निरोगी आणि दीर्घायुष्य जगणे कठीण होत चालले आहे. पण जगात असेही अनेक लोक आहेत ज्यांचे वय 90 ते 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जे 93 वर्षांचे आहेत आणि काही काळापासून चर्चेचा केंद्रबिंदू आहेत. कारण वयाच्या 93 व्या वर्षांचे रिचर्ड मॉर्गन हे एखाद्या तरुणाला लाजवतील इतके फिट आहेत.


 


93 वर्षीय रिचर्डने सांगितले रहस्य!


काही महिन्यांपूर्वी जर्नल ऑफ अप्लाइड फिजियोलॉजीमध्ये एक लेख अत्यंत प्रसिद्ध झाला होता, तो लेख होता रिचर्ड मॉर्गन यांचा... आयर्लंडचे रहिवासी असलेल्या रिचर्ड यांच्या फिटनेसवर जेव्हा संशोधन करण्यात आले, तेव्हा असे आढळले की, त्यांच्या 93 वर्षाच्या प्रवासात त्यांचा आहार, शारीरिक हालचाली, व्यायाम आणि एकूणच आरोग्यावर भर देण्यात आला होता. व्यवसायाने बेकर असलेल्या रिचर्डने सांगितले की, वयाच्या 73 व्या वर्षी नियमित व्यायाम सुरू होईपर्यंत खेळात कधीच रस घेतला नव्हता.


 


तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा फिटनेस!


एका अभ्यासादरम्यान, जेव्हा रिचर्ड 92 वर्षांचे होते, तेव्हा ते इनडोअर रोइंगमध्ये चार वेळा विश्वविजेता झाले आहेत, त्यावेळी त्यांच्या फिटनेस बाबत बोलायचे झाले तर, ते एखाद्या 30 किंवा 40 वर्षांच्या निरोगी व्यक्तीपेक्षाही त्यांचे हृदय, स्नायू आणि एकूण आरोग्य चांगले होते. मॉर्गनने 'वॉशिंग्टन पोस्ट'ला त्यांच्या व्यायामाच्या दिनचर्येबद्दल सांगितले की, एके दिवशी रिचर्ड यांना अचानक जाणवले की, त्यांना नियमित व्याया, तसेच निरोगी आयुष्य घालवण्यात खूप मजा येतेय. रिचर्ड मॉर्गन यांचे काही अनुवांशिक फायदेही असू शकतात असे संशोधकांचे म्हणणे असले तरी, हे निश्चित आहे की, या वयात त्यांचा चांगला फिटनेस त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी सुरू केलेल्या दिनचर्येशी संबंधित आहे. त्यामुळे तुमचे वय कितीही असले तरी तुम्ही व्यायामाला सुरुवात करू शकता आणि रिचर्ड मॉर्गनसारखा उच्च प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास तुम्हीही त्यांच्याप्रमाणे तंदुरुस्त राहू शकता.


 


या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील


सर्व प्रथम, कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी, आपल्या आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.


कमी तीव्रतेच्या व्यायामापासून सुरुवात करा


हळूहळू उच्च तीव्रतेच्या व्यायामाकडे लक्ष केंद्रित करा.


एरोबिक व्यायाम (जसे की पोहणे) आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग समाविष्ट करा.


आपल्या शरीराचे ऐका, वेदना किंवा अस्वस्थतेच्या लक्षणांकडे लक्ष द्या.


हायड्रेटेड राहा आणि संतुलित आहार ठेवा.


तुमची गतिशीलता सुधारण्यासाठी, दुखापतीचा धोका कमी करण्यासाठी सोपे व्यायाम समाविष्ट करा.


दीर्घकालीन व्यायामासाठी तुम्हाला आवडणारे कार्य निवडा



काय करू नये?


स्वतःवर जास्त दबाव आणू नका. विशेषत: सुरुवातीला, आरामदायक वाटणाऱ्या अॅक्टीव्हिटिज मध्ये व्यस्त रहा.


जर तुम्हाला सांध्याची समस्या असतील तर उच्च तीव्रतेचे व्यायाम टाळा. कमी तीव्रतेचे पर्याय निवडा


तुमच्या शरीराच्या दुखापती टाळण्यासाठी, प्रथम वॉर्म अप आणि हलके व्यायाम निवडा.


वेदना होत असताना व्यायाम करणे टाळा. तुम्हाला सतत अस्वस्थता येत असल्यास, तुमच्या प्रशिक्षक किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या.


विश्रांती घ्यायला वगळू नका. तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी आणि नवीन दिनचर्येशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो.


फास्टफूड मधून मिळणाऱ्या कॅलरीजपासून अंतर निर्माण करणे टाळा.


संतुलित, पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित करा.


तुमची क्षमता आणि तुमच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन कोणताही विशिष्ट व्यायाम वगळण्यास अजिबात संकोच करू नका.


तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यास कधीही उशीर झालेला नाही, परंतु तुमची वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊन आणि आरोग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.


 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Child Health : तू चाल पुढं...! मुलांना भावनिकदृष्ट्या 'असे' मजबूत करा की, त्यांना आयुष्यात कधीही कसलीच भीती वाटणार नाही.