Child Health : असं म्हणतात ना, मुलं म्हणजे देवाघरची फुलं, मात्र असे अनेकदा घडते की, जेव्हा मुलं त्यांच्या पालकांसमोर रडतात तेव्हा, त्यांना प्रेमाने सांत्वन देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मुलांनी स्वतःहून शांत व्हावे अशी पालक अपेक्षा करतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात, भावनांवर नियंत्रण ठेवणे ही एक कठीण प्रक्रिया आहे. ते म्हणतात की, मुलांमध्ये अशा प्रकारची कौशल्ये विविध वेळी विकसित होतात. नकारात्मक भावना हाताळण्याची त्यांची क्षमता आनुवंशिकता, त्यांचा स्वभाव, ते ज्या वातावरणात वाढतात यासारख्या घटकांवर अवलंबून असतात. परंतु मुलांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यात पालक, शिक्षक आणि इतर हितचिंतक महत्त्वाची भूमिका बजावतात.
तुम्ही तुमच्या मुलांचा मानसिक विकास सुधारू शकता...
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु जे मुले त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. ते शाळेत अभ्यासासोबतच इतर स्पर्धेत आवर्जून भाग घेतात, आणि आपला उत्तम परफोर्म्स देतात. तसेच इतरांसोबत मिळून मिसळून राहण्याची शक्यता जास्त असते. मुलांना ही महत्त्वाची कौशल्ये शिकवण्यासाठी पालक अनेक युक्त्यांचा वापर करू शकतात. येथे आम्ही तुम्हाला असे पाच मुद्दे सांगत आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांचा मानसिक विकास सुधारू शकता आणि त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकवू शकता.
मुलांना घडविण्यात पालकांचा मोठा रोल
मानसशास्त्रज्ञ सांगतात, ज्या मुलांना राग पटकन येतो आणि शांत होणे कठीण होऊन बसते, अशा मुलांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास त्रास होण्याची शक्यता असते. कारण ते मोठे होत असतात. अशात पालकांनी या मुलांसोबत शांतपणे संवाद साधणे गरजेचे असते. मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या सर्व मुलांना भावनांबद्दल बोलण्यात आणि समजावून सांगण्याचा फायदा होतो. पालक आपली मुलं अगदी लहान असतानाही त्यांच्याशी सर्व प्रकारच्या भावनांबद्दल बोलू शकतात. पुस्तक किंवा चित्रपटातील पात्रे दाखवून तुम्ही त्यांना दुःख, आनंद, राग किंवा चिंता यासारख्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकवू शकता.
मुलांशी सुरक्षित आणि विश्वासार्ह नातेसंबंध ठेवा
एका स्टडीनुसार, ज्या पालकांचे आपल्या मुलांशी सुरक्षित आणि विश्वासार्ह नातेसंबंध आहेत. त्यांचे भावनिक संतुलन पालकांच्या दुर्लक्षाला बळी पडलेल्या मुलांपेक्षा चांगले आहे. पालकांचा मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला असेल तर मुले त्यांच्याशी भावनिकरित्या जोडलेली असतात आणि त्यांच्या भावना ते मोकळेपणाने व्यक्त करू शकतात. तुमच्या मुलांना त्यांच्या भावना ओळखायला आणि व्यक्त होण्यास शिकवा. तुमची मुलं नाराज असताना संभाषण करण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा गोष्टी शांत असतात, तेव्हा त्यांच्याशी बोलण्याची संधी शोधा. तुमची मुलं तुमच्या गोष्टी एका संभाषणात समजू शकणार नाही, परंतु तुम्ही हे हळूहळू करू शकता.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Love Marriage : 'प्रेमविवाह करायचाय हो, पण पालकांची संमती..?' 'या' भन्नाट ट्रिक फॉलो करा, तुमचं काम झालंच म्हणून समजा!