Health Care Tips : प्रोटीन म्हणजे प्रथिने आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. आपल्या रोजच्या आहारात प्रोटीनची गरज असते. यामुळे आपले शरीर निरोगी राहते. सामान्यतः मांसाहार हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. कारण मांसामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. पण याचा अर्थ असा नाही की शाकाहार खाऊन शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर होऊ शकत नाही. अशा प्रकारे, आम्ही तुम्हांला त्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने प्रोटीनची कमतरता दूर केली जाऊ शकते. चला जाणून घेऊयात.


चपाती : चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स तसेच प्रथिने भरपूर असतात. यासोबतच अनेक प्रकारचे बी व्हिटॅमिन, झिंक, आयर्न आणि मॅग्नेशियम यांसह अनेक पोषक घटक पीठामध्ये आढळतात. जे तुमच्या शरीराचे पचन आणि पोषण अनेक पटींनी वाढवतात.


दूध (Milk) : दूध प्यायल्याने कॅल्शियमसोबत प्रथिनेही मिळतात. यामुळेच दूध तुमच्या शरीरातील स्नायूंना मजबूत करण्याचे काम करते.


सुकामेवा (Dry Fruits) : जर तुम्ही दररोज काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि मखनाचा आहारात समावेश केला तर तुम्हांला आयुष्यात कधीही प्रोटीनची कमतरता भासणार नाही. यासाठी हे सर्व ड्रायफ्रुट्स मिक्स करुन रोज खावेत आणि रोज एक ग्लास दूधही प्यावे.


दही (Yogurt) : ज्या लोकांना दूध प्यायला आवडत नाही त्यांनी रोज दुपारच्या जेवणात एक वाटी दही खा, यामुळे तुम्हांला प्रोटीन मिळेल.चणे : चण्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. न्याहारीमध्ये त्यांचे सेवन केल्याने दिवसभर काम करण्यासाठी सतत ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज नाश्त्यात काळे हरभरे खा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha