1. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, बारावीची परीक्षा 4 मार्चपासून तर दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होणार 


2. स्थगित ओबीसी जागांवरील निवडणुका 21 डिसेंबरनंतर घेऊन एकत्रित निकाल जाहीर करणार, सूत्रांची माहिती, उर्वरित निवडणूक ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होण्याची शक्यता


3. म्हाडा पेपरफुटीत मोठा मासा गळाला लागण्याची शक्यता, महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंची चौकशी तर पुण्यात टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याची शक्यता


4. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याबाबत आज निर्णयाची शक्यता, परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय होणार तर आंदोलक आझाद मैदानात मोठी घोषणा करणार


5. राज्यात आता बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार, सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी, चांद्यापासून बांद्यापर्यंत जल्लोष, मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत


6. बर्थ सर्टिफिकेटपूर्वी मिळणार आधारकार्ड; लवकरच रुग्णालयात सुरु होणार नाव नोंदणी 


यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI ने लहान मुलांना आधारकार्ड देण्याची तयारी सुरु केली आहे. असं झाल्यास चिमुकल्यांना जन्मावेळीच आधारक्रमांक मिळेल. UIDAI कडून याबाबतची चाचपणी सुरु आहे. जर सर्व व्यवस्थित पार पडलं तर लवकरच रुग्णालयात लहान मुलांसाठी आधार नोंदणी सुरु होणार आहे. UIDAI ची योजना यशस्वी ठरल्यास मुलांना बर्थ सर्टिफिकेटपूर्वीच आधारकार्ड असेल. बर्थ सर्टिफिकेट मिळण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो. UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नवजात मुलांच्या आधारकार्डबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, "मुंलांना जन्मावेळी आधारकार्ड देण्यासाठी आम्ही रजिस्ट्रारसोबत करार करण्याचा प्रयत्न करत आहोत. 99.7 टक्के लोकांना आधारकार्ड देण्यात आलं आहे. सध्या देशातील 131 कोटी लोकांकडे आधारकार्ड आहे. आता आम्ही नवजात मुलांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येकवर्षी दोन ते अडीच कोटी मुलांचा जन्म होतो. या सर्वांना आधारक्रमांक देण्याची योजना सुरु आहे. मुलांच्या जन्मावेळीच फोटो क्लिक करुन आधारकार्ड देण्याचा आमचा प्रयत्न असेल. "


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटीन : 16 डिसेंबर 2021 : गुरुवार : एबीपी माझा 



7. उत्तर भारतात थंडीची लाट, शिमल्यात बर्फवृष्टीमुळे पारा उणे दोन अंशांवर, वीकेंडला महाराष्ट्रही गारठण्याची शक्यता


8. बीडच्या लवूळ गावात वानरांची दहशत, कुत्रा आणि वानर यांच्यातील भांडणामुळे लवूळ ग्रामस्थ त्रस्त, वानरांकडून कुत्र्यांची पील्ले पळवण्याचा प्रताप


9. बेस्टचे सुपर सेव्हर प्लान; एका दिवसापासून 84 दिवसांपर्यंतच्या प्रवासाचं नियोजन शक्य


10. अभिनेत्री आलिया भट्टवर मुंबई मनपा कारवाई करणार का? कोरोनाबाधितांच्या संपर्कात येऊनही विलगीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका