Yogurt and Depression: अनेकांना पराठ्यासोबत किंवा खिचडीसोबत दही खायला आवडते. दही खाण्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत. दह्यामुळे शरीराला एक प्रकारचा थंडावा मिळतो. तसेच त्यामुळे जेवणाची चवही वाढते. दह्यामध्ये लॅक्टोबैसिलस हा बॅक्टेरिया फ्रेंडली जीवाणू असतो. शरीरातील  मायक्रोबायोम कॅरेक्टर दह्यामुळे कमी होते. त्यामुळे दही खाल्याने टेंशन किंवा डिप्रेशन कमी होते. जाणून घेऊयात दही खाण्याचे फायदे- 


दह्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, राइबोप्लेविन, विटामिन बी-12, विटामिन बी-2, मैग्नीशियम आणि पोटेशियम ही पोषक तत्वे असतात. जर तुम्ही दही साखरेसोबत खात असाल तर तुमच्या आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरेल. दह्यामध्ये अनेक  विटामिन्स असतात. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन देखील वाढते. दह्यामध्ये  प्रोबायोटिन्स असतात.  त्यामुळे तणाव येत नाही. त्यामुळे रोज सकाळी दही खावे.
 
सध्या अनेकांना डिप्रेशन येते. त्यासाठी डाएटकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी रोज एका वाटी दही खावे. त्यामध्ये मिठ किंवा सारख तुम्ही टाकू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही दही खाऊ शकता. पण दुपारच्या वेळी दही खाणे टाळावे. 


दही खाल्ल्यानंतर या गोष्टी टाळा
दही खाणं जसं आरोग्याला चांगलं आहे तसं ते खाताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. दह्यासोबत काही पदार्थ खाल्याने आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दह्यासोबत ठराविक पदार्थ खाण्याचं टाळणे अत्यावश्यक आहे. दह्यासोबत आंबट फळ खाऊ नयेत, कारण दही आणि फळांमध्ये वेगवेगळे एंझाइम्स असतात. त्यामुळे ते एकत्र पचत नाहीत. त्यामुळे दही आणि अंबट फळे एकत्र खाऊ नयेत. तसेच दह्यासोबत माशे खाऊ नयेत कारण मशामध्ये उष्णता असते. तसेच चिकन देखील खावू नये. 


Health Care Tips : सकाळी उठल्यावर पाणी पिणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर; काय आहे कारण?


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित


टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.