Water Benefits: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या शरीरात 70% पाणी असते. त्यामुळे पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.  दिवसभरात पाणी पित राहावे. जाणून घेऊयात रोज किती प्रमाणात पाणी प्यावे. 


 सकाळी पाणी पिण्याचे फायदे 
वजन कमी होते- पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातील अॅसिडीटी कमी होते. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने पचन क्रिया देखील सुधारते. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुम्ही साकाळी रिकाम्या पोटी पाणी पिले पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढेल.


केस चांगले ठेवण्यासाठी पाणी प्या 
तुमच्या केसांमधील एका स्ट्रॅंडच्या वजनाचा 25% भाग हा पाण्याचा असतो. पाणी कमी प्यायल्याने केस पातळ आणि नाजुक होतात. त्यामुळे भरपूर पाणी प्यायल्याने तुमचे केस घनदाट आणि मजबूत होतील. 


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित


सकाळी आणि दुपारी किती पाणी प्यावे?
सकाळी उठल्यानंतर लगेच 3 कप पाणी प्यावे. रोज याच प्रमाणात पाणी प्या. जेवल्यानंतर 2 तासांनंतर पाणी प्यायले पाहिजे. तसेच पाणी पिल्यानंतर 45 मिनीटांनंतर नाश्ता करावा. त्या आधी काहीही खाऊ नये. 


Weight Loss Drink : वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 1 ग्लास काकडीचा ज्यूस


तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे अनेक फायदे; अनेक आजारांवरही गुणकारी


तांब हे पोट, लिव्हर आणि किडनीला डिटॉक्स करते. तांब्याच्या भांड्यांमध्ये ठेवलेले पाणी प्यायल्याने बॅक्टिरिया मरतात. तसेच तांब पाणी शुद्ध करते.  त्यामुळे पोटामध्ये कधीही अल्सर किंवा  इफेक्शन होत नाही. अनेक लोकांना सांधे दुखीचा त्रास होतो.  तांब्यामध्ये असणारे अॅंटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज सांधे दुखीपासून आराम देतात. तांब्यामध्ये असणारे अॅंटी- ऑक्सीडेंट्स चेहऱ्यावरील  फाइन लाइन्स आणि सुर्कुत्या घालवते. तसेच तुमच्या स्किनवरील सुर्कुत्यां वाढवणारे सर्वांत मोठे कारण म्हणजेच फ्री रेडिकल्सपासून वाचवून तुमच्या स्किनवर एक सुरक्षा लेअर तयार करते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी प्यायल्याने तुमची स्किन चांगली राहते.