Asafoetida Benefits : भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांच्या पदार्थांमध्ये एक पदार्थ हमखास आढळतो तो म्हणजे 'हिंग'. दररोज फक्त एक चिमूटभर हिंग खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तज्ञांच्या मते, दररोज 3 ग्रॅम हिंग खाल्ल्यास 2% पोटॅशियम, 1% कार्बोहायड्रेट, 10% लोह आणि 1% कॅल्शियमची गरज भागवता येते. हिंगामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे रोगांपासून आपले संरक्षण करतात. जाणून घ्या त्याचे फायदे.
दम्याच्या त्रासावर फायदेशीर :
हिंगामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म श्वसनाच्या समस्यांपासून आराम देतात. कोरडा खोकला आणि ब्राँकायटिसच्या समस्येत आराम मिळतो. यासाठी मधामध्ये थोडी हिंग आणि थोडे सुंठ पावडर मिसळून त्याचे नियमित सेवन करावे.
वृद्धत्व विरोधी गुणधर्म :
हिंगामध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. हिंगाच्या सेवनाने टायरोसिनचे उत्पादन कमी होते, जे त्वचेच्या निस्तेजतेमागील मुख्य कारण मानले जाते. हिंग खाण्याव्यतिरिक्त चेहऱ्यावरही लावू शकता.
पचनक्रिया सुधारण्यास मदत :
हिंगाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. यामुळे अन्न खाल्ल्यानंतर पोटफुगीचा त्रास होत नाही. जेवणानंतर ताकामध्ये हिंग आणि काळे मीठ मिसळून सेवन करता येते.
रक्तदाब नियंत्रणावर फायदेशीर :
जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर हिंगाचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हिंग हे नैसर्गिक रक्त पातळ करणारे मानले जाते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :