Cucumber Detox Water : उन्हाळ्याचे दिवस सध्या सुरु आहेत. यामध्ये शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही काकडीपासून बनवलेले पेय पिऊ शकता. काकडीपासून बनवलेले डिटॉक्स वॉटर तुम्हाला अनेक प्रकारे फायदेशीर ठरेल. हे पचन सुधारण्यासह रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचेसाठी देखील चांगले आहे. ते कसे बनवायचे ते जाणून घ्या-


पेयासाठी लागणारे साहित्य : 



  • 1 लिटर पाणी

  • 3 काकडी

  • 4 लिंबू

  • मूठभर पुदिन्याची पाने


असे बनवा पेय : 



  • सर्व प्रथम काकडी आणि लिंबू बारीक कापून घ्या. पुदिन्याची पाने कापून बाजूला ठेवा.

  • आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काकडी, लिंबू आणि पुदिन्याची पाने टाका. 

  • ते मिसळा आणि झाकणाने भांड झाकून टाका.

  • आता भांडे काही तास फ्रीजमध्ये ठेवा किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रात्रभर ठेवू शकता.

  • थंडगार सर्व्ह करा. तुम्ही ते जास्त वेळ ठेवू शकता आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दिवसभर हे डिटॉक्स वॉटर थोडे थोडे करून पिऊ शकता.

  • डिटॉक्स पाणी नियमित प्या. विशेषतः उन्हाळ्यात. हे तुम्हाला ताजेतवाने ठेवेल आणि वजन कमी करण्यास देखील मदत करेल. 


काकडीपासून तुम्ही ताकदेखील बनवू शकता


काकडीपासून आरोग्यदायी ताकही बनवता येते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यापासून पोट थंड ठेवण्यापर्यंत अनेक प्रकारे याचा फायदा होईल.


काकडीचे ताक बनविण्यासाठी साहित्य



  • 1 कप दही

  • अर्धी किसलेली काकडी

  • 2 टीस्पून चिरलेली पुदिन्याची पाने 

  • 1 टीस्पून भाजलेले जिरे

  • टीस्पून लाल तिखट

  • काळे मीठ चवीनुसार

  • कोथिंबीर 


काकडीचे ताक बनविण्यासाठी कृती 



  • सर्व प्रथम एका ब्लेंडिंग जारमध्ये दही, काकडी, पुदिन्याची पाने एकत्र करा.

  • त्यानुसार पाणी घाला. तुम्हाला हवी तेवढी पाण्याची पातळी ठेवा.  

  • 30 सेकंदांपेक्षा जास्त मिश्रण होणार नाही याची काळजी घ्या.

  • आता ते एका भांड्यात काढून मसाले मिसळा. पुदिन्यापेक्षा तुळशीची चव जास्त आवडत असेल तर मिश्रण करताना तुळशीची पाने किंवा कोथिंबीरही घालू शकता. 

  • सर्व्हिंग ग्लासमध्ये काढून सजवून सर्व्ह करा. जर तुम्हाला काळे मीठ घालायचे नसेल तर तुम्ही त्यात सैंधव मीठ टाकू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :