Independence Day 2022 : यंदा भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. सोशल मीडियावरही सर्वजण एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त आहेत. दरम्यान यामध्ये काही जण 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेछा देत आहेत, तर काही जण 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेछा देत आहेत.  याबाबतचा गैरसमज दूर करुन घ्या. भारतीयांसाठी हा फार महत्त्वाचा दिवस आहे. आजच्याच दिवशी भारताला ब्रिटीशांच्या जुलुमी साम्राज्यातून सुटका झाली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि महिला योद्ध्यांनी बलिदान दिलं, यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं.


यंदा नेमका कितवा स्वातंत्र्यदिन?


15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं. अनेक जण यासाठी प्राणांचं बलिदान दिलं. यानंतर 15 ऑगस्ट 1978 रोजी स्वातंत्र्याचा पहिली वर्षपूर्ती साजरी केली गेली, हा दिवस भारताचा दुसरा स्वातंत्र्य दिन होता. दिन मोजताना ज्या दिवशी घटना घडली तो दिवसही मोजला जातो. याच प्रकारे 1957 साली भारताला स्वातंत्र्य मिळून दहा वर्ष पूर्ण झाली, त्या दिवशी भारताचा 11 वा स्वातंत्र्य दिवस होता. त्याच प्रकारे यंदा 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून यंदा 76 वा स्वातंत्र्य दिन आहे. 


स्वातंत्र्यदिनाचा इतिहास 


इ.स. 1770 पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य आणि युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून 1947 पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. 


स्वातंत्र्यदिनाचं महत्त्व  


भारताचा स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो कारण आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यासह देशभरात ठिकठिकाणी ध्वजारोहण केलं जातं. तसेच विविध देशभक्तिपर अभियान आणि उपक्रम राबवले जातात.


महत्वाच्या इतर बातम्या :