Har Ghar Tiranga : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तर शनिवारी घरावर तिरंगा फडकवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Mister Amit Shah) यांच्यापासून इतर केंद्रीय मंत्र्यांनी हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियानाअंतर्गत आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवला.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि पत्नी सोनल शाह यांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवला. याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन
देशभरात 75 व्या स्वातंत्र्यदिनाची (Independence Day) तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.