Hair Care : उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाचा परिणाम केवळ चेहऱ्यावरच नाही, तर केसांवरही होतो. त्वचेवर सनस्क्रीन लावून तुम्ही त्याचे संरक्षण करु शकता. पण केसांना उष्णतेपासून वाचवण्यात आपण सगळेच अपयशी ठरतो आणि त्यामुळे केस हळूहळू तुटायला लागतात आणि कमी होतात. जर तुम्हीही या सर्व समस्यांनी त्रस्त असाल, तर हेअर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या, जे तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवू शकतात.
कोमट तेलाने मसाज करा
उन्हात केसांची आर्द्रता निघून जाते आणि केसांची मुळे कमकुवत होऊ लागतात, अशा परिस्थितीत केसांना पोषणाची गरज असते, यासाठी केसांच्या मुळांना कोमट खोबरेल किंवा ऑलिव्ह ऑईल लावा. केस गळण्याची समस्या असेल तर त्यापासून सुटका मिळेल.
नैसर्गिक शाम्पू वापरा
उष्णतेमुळे केसांची चमक कुठेतरी हरवते. उन्हामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी केमिकलयुक्त हार्ड शाम्पू वापरणं टाळा. बाजारात मिळणारे कोणतेही आयुर्वेदिक किंवा अॅलोवेरा जेल शाम्पू वापरावा, यामुळे केसांना ओलावा मिळेल आणि चमकही येईल.
हेअर मास्क लावा
उन्हाळ्यात हेअर मास्क लावणं देखील आवश्यक आहे, यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. केस मऊ होतात आणि डॅमेज कंट्रोल होते. हेअर मास्क लावण्यासाठी केळी मॅश करुन त्यात दोन ते तीन चमचे बदामाचे तेल मिसळा. हे मिश्रण केसांच्या लांबीपासून मुळापर्यंत पूर्णपणे नीट लावा, 15 ते 20 मिनिटे हे मिश्रण केसांवर राहू द्या आणि नंतर केस धुवा.
चहाच्या पाण्याने केस धुवा
जर केस खूप खराब झाले असतील तर त्यासाठी तुम्ही चहाच्या पाण्यानेही केस धुवू शकता. यासाठी पातेलं अर्ध पाण्याने भरुन त्यात चहाची पाने टाकून उकळा. पाणी थंड झाल्यावर केस धुवा आणि केस टॉवेलमध्ये गुंडाळून 15 ते 20 मिनिटे ठेवा, त्यानंतर केस सामान्य पाण्याने धुवा. यामध्ये असलेले कॅफिन केसांच्या दुरुस्तीसाठी मदत करते आणि केसांचा कोरडेपणा दूर होतो.
उन्हात जाताना केस कव्हर करा
जेव्हाही घराबाहेर पडता तेव्हा सुती कापडाने केस बांधून घ्या, जेणेकरुन केसांना व्यवस्थित हवा मिळेल आणि उष्णतेचा परिणाम केसांवर होणार नाही.
(टीप: या लेखात नमूद केलेले उपाय आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.)
हेही वाचा: