MNS Chief Raj Thackeray: टोलदरवाढीच्या (Toll Hike) मुद्द्यावर आता मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः मैदानात उतरले आहेत. आपल्या लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांची वक्तव्य काय केलेली, ते राज ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेत मांडलं. तसेच, टोलमुक्त महाराष्ट्रासाठी काय-काय आश्वासनं दिली गेली आणि त्याचं पुढे काय झालं? या सर्वाचा लेखाजोखा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडला आहे. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, टोलनाके बंद केले नाहीतर टोलनाके जाळून टाकू असा गंभीर इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलताना म्हणाले की, "ठाण्यातील पाच टोलनाक्यांवर दरवाढ झाली, त्याविरोधात मनसे आमदार अविनाश जाधव आणि इतर पदाधिकारी उपोषणाला बसले होते. मी कालही याबाबत बोललो होतो, पण मुद्दाम आज पुन्हा सांगतोय. मला यासंदर्भात राज्य सरकारकडून एक पत्र आलं, त्या पत्रात एक स्तंभ होता. त्यात कोणत्या वाहानांना टोल आहे आणि कोणत्या वाहानांना टोल नाही, हे नमूद करण्यात आलं होतं. साधारणतः 2010 मध्ये टोल आंदोलन सुरू झालं. टोलचा सर्व पैसा कॅशमधला पैसा, याचं होतं काय? त्याच-त्याच कंपन्यांना हे टोल कसे मिळतात? शहरांमधल्या रस्त्यांवर खड्डेच पडणार असतील मग हा पैसा जातो कुठे?"


मनसेच्या टोलच्या आंदोलनानंतर त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजपच्या युतीचं सरकार होतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी होती. आता काय आहे? हे कोणालाच माहिती नाही. पण त्यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय म्हणालेले, हे काही क्लिपमधून पाहुयात, असं म्हणत राज ठाकरेंनी एक-एक मिनिटांच्या क्लिप भर पत्रकार परिषदेत दाखवल्या. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या टोलनाक्यासंदर्भातील क्लिप दाखवल्या. मनसेनं आंदोलन करुन अधिकृत आणि अनधिकृत असे 67 टोलनाके बंद केले होते. अजित पवार व्हिडीओमध्ये ज्या 44 टोलनाक्यांबाबत बोलत आहेत, ते मनसेनं त्यांच्यावर दबाव टाकून बंद करायला लावले असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 


राज ठाकरेंकडून फडणवीसांची पोलखोल, काय झालं नेमकं? 


टोलदरवाढीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केली आहे. देवेंद्र फडणवीस टोलच्या मुद्द्यावरून धांदात खोटं बोलत आहेत, असं सांगतानाच टोल हा काही काश्मीरचा विषय नाही. टोल रद्द केले नाही तर आम्ही टोल नाके जाळून टाकू असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, टोलचे पैसे नेमके जातात कुठे? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 


...तर टोल नाके आम्ही जाळून टाकू : राज ठाकरे


"टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. मला असं वाटतं याची शहानिशा झाली पाहिजे. येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येतंय ते पाहू. नाहीतर आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल नाहीये, तर आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील आणि टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल लावू दिला जाणार नाही. जर याला विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू"


राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? 


गेल्या चार दिवसांपूर्वी अविनाश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पाच टोलच्या टोलवाढी विरोधात उपोषण केलं
त्यानंतर काल आम्ही तिकडे गेलो भेटलो
राज्य सरकारकडून आम्हाला यानंतर पत्र आलं
टोल वाढीचं आंदोलन आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करतोय
टोलचं  कंत्राट सारखं सारखं त्याच कंपन्याना का?
आपण टोल भरतो, मात्र तरीही रोड खराब
या टोल संदर्भात राष्ट्रवादी आणि काँग्रेस इतर पक्ष नेते काय म्हणालेत दाखवतो, असं म्हणत राज ठाकरेंनी काही व्हिडीओ क्लिप दाखवल्या 
व्हिडीओ प्ले केलाय, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे जुने व्हिडीओ दाखवले जात आहेत टोल बंद करावा लागेल
अजित पवार यांचा व्हिडीओ दाखवला जातोय 44 टोल बंद केले आणि त्यावेळेस निर्णय घेतले ते दाखवत आहेत
आमचं आंदोलन सुरु असताना 67 टोल अधिकृत आणि अनधिकृत बंद केले. त्याबद्दल हे बोलत आहेत
पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचा  व्हिडीओ दाखवला जात आहे. आम्ही टोल बंद करतोय असा व्हिडीओ शिवसेना भाजप सरकार सत्तेत असताना फडणवीस एका पत्रकार परिषदेत सांगत आहेत
गोपीनाथ मुंडे यांचा  व्हिडीओ दाखवला जातोय. टोल मुक्त महाराष्ट्र करा यासाठी आंदोलन करणार असं म्हटलेले
उद्धव ठाकरे म्हणाले होते टोल मुक्त महाराष्ट्र करू तो ही व्हिडीओही राज ठाकरेंनी  दाखवला


पाहा व्हिडीओ : Raj Thackeray PC : Devendra Fadnvis, Uddhav Thackeray यांचा टोलमाफीचा दावा खोडला, व्हिडीओ दाखवले