Hair Care Tips : स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकालाच आपले केस (Hair) प्रिय असतात. केस आपले व्यक्तिमत्त्व उभारून आणण्यासाठी मदत करतात. केस चांगले (Healthy Hair) असतील तर कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल करून तुम्ही तुमचा लूक अधिक आकर्षक करू शकता. मुलींना केसांबद्दलच्या अनेक समस्या असतात. जसे की, केस पातळ होणे, केसगळती होणे, केसांचा वॉल्युम कमी होणे यांसारख्या अनेक समस्या असतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स (Hair Care Tips) सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या केसांचा व्हॉल्युम सुद्धा वाढेल आणि तुमचे केस पातळही होणार नाहीत. 

  


केसांचा वॉल्युम टिकवून ठेवण्यासाठी काही टिप्स : 


आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुवा 


धूळ, घाण आणि तेलामुळे केस अनेकदा खराब होतात. आणि त्यामुळे केसांचे प्रमाण कमी होते, ते चिकट होतात. त्यामुळे केसांची मात्रा वाढवण्यासाठी केस स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही आठवड्यातून किमान दोन दिवस केस धुवा.   


केस चांगले धुवा


अनेकदा असे होते की केस तर धुतले जातात. मात्र, त्यामध्ये शॅम्पू आणि कंडिशनर केसांमधून चांगले तेल काढू शकत नाही. त्यामुळे केस आणखी चिकट वाटू लागतात. अशा स्थितीत केसांची मात्राही संपुष्टात येऊ लागते. यासाठी केसांना व्हॉल्यूम देण्यासाठी शॅम्पू केल्यानंतर केस चांगले धुवा.


केसांची मालिश नीट करा


केसांना सुंदर बनवण्यासाठी आणि व्हॉल्यूम देण्यासाठी, नियमितपणे कोमट तेलाने मालिश करा. यासाठी तुम्ही खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल आणि एरंडेल तेल वापरू शकता. केस निरोगी आणि घट्ट राहिल्यास व्हॉल्यूम आपोआप येतो.


बाजारातील प्रोडक्ट्स सुद्धा वापरू शकता 


आजकाल, केसांची मात्रा वाढविण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. जी तुम्ही वापरू शकता. मात्र, हे लक्षात ठेवा की हे प्रोॉक्ट्स महाग तसेच केमिकलयुक्त असतात. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे प्रोडक्ट्स खरेदी करू शकता.   


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :