Shikakai Amla Ritha Alovera Hair Mask : हिवाळ्यामध्ये त्वचेप्रमाणे केसही रुक्ष होतात, यामुळे केस गळती सारखी समस्या वाढते. याशिवाय थंड वातावरणात कोंडाही होतो. केसांसंबंधित अशा अनेक समस्यांपासून तुम्ही घरच्या घरी सोप्या उपायाने सुटका मिळवू शकता. तुम्ही घरगुती हेअर मास्क वापरून केस गळती, कोंडा, केस रुक्ष होणे या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. या घरगुती हेअर मास्कचा वापर करुन तुमचे केस मजबूत, मऊ आणि चमकदार होतील.


केस गळती, कोंड्यापासून सुटका हवीय आणि केसांना चमक आणण्यासाठी आठवड्यातून एकदा खास हेअर पॅक वापरून पाहा. केसांसंबंधित सर्व समस्यांवर रामबाण उपाय, वाचा सविस्तर


आवळा केसांसाठी लाभदायक


आवळ्यामधील औषधी गुणधर्म तुमच्या केसांना मजबूत बनवण्यासाठी मदत करतात. यामुळे केस गळती, कोंडा यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. आवळा तुमच्या टाळूमध्ये मेलेनिन वाढवण्यास मदत होते, ज्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होते.केसांना आवळ्याचा रस लावल्याने केसांची वाढ होण्यास होते. 


शिकाकाई केस वाढीसाठी फायदेशीर


शिकाकाई केसांना आवश्यक पोषण मिळते. शिकाकाईमुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते. स्कॅल्पवरील मळ दूर करून केस स्वच्छ करण्यास शिकाकाई उपयुक्त आहे. शिकाकाईमुळे केस वाढीस मदत होते.


रीठा केसांना देईल चमक


रीठा नैसर्गिक शॅम्पू आहे. रीठाच्या पान्याने केस धुतल्याने केसांसंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते. रीठाच्या वापरामुळे कोंड्याची समस्या दूर होऊन केस मजबूत होण्यास मदत होते. रीठामुळे केसांना नवीन चमक मिळण्यास मदत होते. याच्या वापरामुळे केस गळतीची समस्याहूी दूर होते.


कोरफड


कोरफडमध्ये असणारे पोषक घटक केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे केस मजबूत आणि चमकदार होण्यास मदत होते. याच्या नियमित वापरामुळे केस वाढीस चालना मिळते.


हेअर मास्क बनवण्याची पद्धत


एका वाटीमध्ये एक चमचा आवळा पावडर, शिकाकाई पावडर आणि रीठा पावडर घ्या. यामध्ये तीन ते चार चमचे एलोवेरा जेल किंवा तीन ते चार चमचे दही मिसळून याचा हेअर मास्क बनवा. हा हेअर मास्क केसांना लावा आणि किमान 40 ते 45 मिनिटे ठेवा. त्यानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर शॅम्पू लावणं टाळा. दुसऱ्या दिवशी माईल्ड शॅम्पूने केस धुवा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Makar Sankranti 2024 : यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका, 'हा' रंग घालणं शुभ