Hair Care Tips : बदलत्या हवामानामुळे केस आणि त्वचेच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. केसांची (Hair Care Tips) योग्य निगा राखली तरी केस झपाट्याने गळू लागतात. अशा वेळी केवळ बदलत्या ऋतूमुळेच नाही तर प्रदूषण, काळजी न घेणे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळेदेखील केस खराब होतात. काळजी घेतल्याने केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. पण, काळजी न घेतल्याने केस गळू लागले तर ही मात्र, फार चिंतेची बाब आहे. केस धुताना किंवा केसांना तेल लावताना अशा अनेक चुका वारंवार होतात ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात.


हिवाळ्यात केस धुण्यात लोक जास्त चुका करतात. त्यात सर्वात सामान्य बाब म्हणजे खूप गरम पाण्याचा वापर. हिवाळ्यात केस धुताना तुम्हीदेखील या चुका करत असाल तर आजपासूनच ही सवय बदला.  


ऑइलिंग संबंधित चूक करणे


केसांची काळजी घेताना केसांना तेल लावल्याने केस चमकदार आणि मजबूत दिसतात. मात्र, अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ केसांना तेल लावले तर केस कोरडे होऊ शकतात. जास्तीत जास्त अर्धा तास केसांना तेल लावून ठेवा.


केसांवर अनेक केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करणे 


केसांवर कोणतेही केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. नकळत केसांवर कोणतेही प्रोडक्ट वापरल्याने केस कोरडे होतात, पांढरे होतात आणि तुटतात.


खूप गरम पाण्याने केस धुणे


हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुताना जाणीवपूर्वक चूक केली जाते. जास्त गरम पाणी वापरल्याने केस कमकुवत आणि निर्जीव होऊ शकतात. इतकेच नाही तर केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात आणि काही वेळा केस गळायला लागतात.


टॉवेलने केसांना चोळणे 


ओले केस टॉवेलने वाळवणे ही सामान्य गोष्ट आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की, तुमची ही सवय नुकसानास कारणीभूत ठरू शकते. केसांना टॉवेलने घासल्यावर केस कोरडे होतात तसेच केसांचा रंगही जातो.  


हीटिंग टूलचा वापर करणे


केस धुतल्यानंतर, ते कोरडे करणे किंवा ड्रायरसारख्या गरम मशिनने सेट करणे आता सामान्य झाले आहे. हेअर ड्रायर केसांसाठी धोकादायक आहे हे माहीत असूनही त्यावर केसांची स्टाईल केली जाते.


ओल्या केसांना टॉवेल बांधणे


केस धुतल्यानंतर त्यावर टॉवेल बांधण्याची चूक करू नका. कपड्यांमधील ओल्या केसांमुळे कोंडा होण्याचा धोका वाढतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Skin Care Tips : सणासुदीच्या दिवसांत तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढवायचाय? 'या' सोप्या पद्धतींनी घरच्या घरी त्वचेची काळजी घ्या