Main Atal Hoon: अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे बॉलीवूडमधील  टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहेत. पंकज यांनी  चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली आहेत. पंकज यांचे   OMG 2 आणि Fukrey 3 हे 2023 मध्ये रिलीज झालेले चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. आता पंकज हे  दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.  मैं अटल हूं (Main Atal Hoon) या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे.


फिल्म कम्पेनियन दिलेल्या मुलाखतीमध्ये  पंकज यांनी मैं अटल हूं या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारण्यासाठी केलेल्या तयारीबद्दल सांगितलं आहे.   पंकज यांनी सांगितलं की, "मी  मैं अटल हूं या चित्रपटाचे 60 दिवस शूटिंग केले आणि त्या 60  दिवसात मी फक्त खिचडी खाल्ली, तीही स्वतःच बनवली."


पंकज यांनी मुलाखतीमध्ये हे देखील सांगितलं की, त्यांनी दुसर्‍या लोकांना  त्याच्यासाठी जेवण बनवायला करायला सांगितलं नाही किंवा रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर केलं नाही. ते म्हणाले, “दुसरे लोक कसे जेवण बनवतात हे तुम्हाला कधीच माहित नसते. मी माझ्या जेवणात तेल किंवा मसाले घातले नाहीत. मी फक्त साधी डाळ, तांदूळ  भाज्या टाकून खिचडी तयार करत होतो."






पंकज यांनी सांगितलं की,  अभिनेत्यांनी योग्य खाण्याच्या सवयींकडे लक्ष दिले पाहिजे, असे  माझे मत आहे. ते म्हणाले, “त्या भावना योग्य पद्धतीनं मांडण्यासाठी तुम्हाला मन आणि शरीर यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. यासाठी अभिनेत्याने हलके अन्न खावे." 'मैं अटल हूँ' हा चित्रपट 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित आहे.


पंकज यांचे आगामी चित्रपट


 'मैं अटल हूं' या चित्रपटासोबतच अनुराग बसूच्या मेट्रो इन दिनो आणि स्त्री-2  या चित्रपटांमधून पंकज हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या  69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  सोहळ्यात पंकज त्रिपाठी  यांना 'मिमी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.


संबंधित बातम्या:


Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ'चं शूटिंग पूर्ण; पंकज त्रिपाठी पोस्ट शेअर करत म्हणाले,"अटल'चा प्रवास..."