Kidney Problem Symptoms : शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व अवयव निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. शरीरातला एकही अवयव कमकुवत झाला किंवा आजारी पडला तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. शरीरातील असाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे मूत्रपिंड (Kidney). किडनी शरीरातील पाणी फिल्टर करण्यास मदत करते. किडनी शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. किडनीमध्ये प्रॉब्लेम असल्यास किडनी निकामी होऊन डायलिसिसचीही समस्या उद्भवते. शरीरात अत्यंय महत्वाची भूमिका बजावणाऱ्या किडनीची जाणून घ्या लक्षणे आणि कोणत्या सवयींमुळे किडनी निरोगी राहते. 


किडनीच्या आजाराची लक्षणे :


1. किडनीच्या आजारामुळे त्वचेवर खाज सुटणे, शरीर कोरडे पडणे, भेगा पडणे. 
2. त्वचेचा रंग जास्त पांढरा होतो आणि खाज सुटण्याचे स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.
3. शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता असते, त्यामुळे नखांवर पांढरे डाग पडतात आणि नखं कमकुवत होतात.  
4. किडनीच्या आजारामुळे हाता-पायांवर सूज येऊ लागते. 
5. कधी कधी पोटदुखी आणि पाठदुखीची समस्या देखील होते.
6. टॉयलेटमध्ये जाताना जळजळ होते.   


अशा प्रकारे किडनी निरोगी ठेवा


शरीर हायड्रेट ठेवा :


किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या राहणार नाही आणि किडनी निरोगी राहते. 


रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा :


रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने किडनीवर खूप परिणाम होतो. मधुमेही (डायबिटीस) रुग्णांमध्ये किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. 


रक्तदाब नियंत्रणात ठेवा :


किडनी निरोगी ठेवण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवणेही गरजेचे आहे. हृदयाशी संबंधित समस्या असली तरीही किडनीच्या त्याचा परिणाम होतो. 


मद्यपान आणि धूम्रपान करू नका :


यकृत आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही मद्यपान आणि धूम्रपान टाळले पाहिजे. अल्कोहोलचा तुमच्या मूत्रपिंड आणि यकृतावर गंभीर परिणाम होतो आणि धूम्रपानामुळे तुमच्या फुफ्फुसांचे नुकसान होते.


व्यायाम महत्त्वाचा :


संपूर्ण शरीर निरोगी ठेवायचे असेल तर दररोज नियमित व्यायाम करा. व्यायामासाठी तुम्ही दररोज 30 मिनिटे काढली पाहिजेत. यामुळे किडनी निरोगी राहील. 


झोपेची काळजी घ्या :


योग्य वेळी झोप घेतल्याने आपले शरीर दुरुस्त होते. शरीराच्या सर्व अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. यासाठी 7-8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha