Kim Jong Un : उत्तर कोरियाचा (North Korea) हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) च्या अनेक विक्षिप्त निर्णयाबद्दल आपण ऐकून असतोच. आता त्याने पुन्हा एकदा निर्घृणतेचा कळस गाठला आहे. मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे की, उत्तर कोरियाने गेल्या तीन वर्षात सात लोकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे कारण त्यांनी दक्षिण कोरियाचे काही व्हिडिओ पाहिले होते. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी शिक्षेची घोषणा केल्याचे सांगण्यात आले आहे.


दक्षिण कोरियन अधिकार संस्थेने, संक्रमणकालीन न्याय कार्य गटाने, सहा वर्षांमध्ये उत्तर कोरियाहून स्थलांतर केलेल्या 683 नागरिकांची मुलाखत घेतली, त्यानंतर यामधील 27 अहवाल दस्तऐवज म्हणून सादर केले गेले. यापैकी बहुतेकांवर ड्रग्ज, वेश्या व्यवसाय आणि मानवी तस्करीशी संबंधित गुन्ह्यांचा आरोप होता.


वृत्तपत्राने मांडला दावा
मे 2021 मध्ये दक्षिण कोरियाच्या ऑनलाइन वृत्तपत्रांनी उत्तर कोरियन वृत्तपत्र 'डेली एनके' (Daily NK) च्या हवाल्याने दावा केला होती की, उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण कोरियाचे चित्रपट आणि संगीत व्हिडिओ असलेल्या सीडी आणि यूएसबी लोकांना बेकायदेशीरपणे विकण्याचा प्रयत्न केला होता. त्या व्यक्तीला ठार मारण्यात आले.


हसाल तर फसाल
उत्तर कोरियात सध्या 11 दिवस हसण्यावर बंदी असणार आहे. जर लोकांनी सेलिब्रेशन केलं किंवा हसताना दिसले तर त्यांच्यावर आता कडक कारवाई होणार आहे. देशाचे माजी नेते आणि सध्याचा हुकुमशाह किम जोंग उनचे वडील किम जोंग-इल यांच्या 10 व्या पुण्यतिथिच्या निमित्ताने सरकारने लोकांच्या हसण्यावर बंदी घातली आहे. किम जोंग इल (Kim Jong il) च्या पुण्यतिथी निमित्त 11 दिवसांपर्यंत देशात कुणीही आनंद साजरा करु शकणार नाही. राष्ट्रीय शोक असल्यानं लोकांना हसणे आणि दारु पिण्यावर बंदी असणार आहे.  


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha