Omicron In India : देशभरात ओमायक्रॉनबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. वाढत्या ओमायक्रॉनबाधितांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यांनी रात्रीच्या वेळी संचार बंदी लागू केली आहे. ओमायक्रॉनची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने चिंता वाढली आहे. देशातील 183 ओमायक्रॉन बाधितांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील 70 टक्के बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत.
देशात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 415 वर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, जगातील 108 देशांमध्ये या व्हेरियंटचे आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत 17 राज्यांमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 415 प्रकरणे समोर आले आहे. त्यापैकी 115 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 108 ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. भारतात ओमायक्रॉनमुळे आतापर्यंत एकही जणाचा मृत्यू झाला नाही.
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना संपूर्ण जग करत असून काळजी घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे. वर्षाच्या शेवटी होणारे उत्सव, कार्यक्रमांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. गर्दीची ठिकाणे आणि अनावश्यक प्रवास न करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.
दरम्यान, मुंबईत नव्यानं सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढायला लागली आहे. राज्य सरकारनं ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यूही जारी केला आहे. मात्र, तरीही बाजारपेठांमधली गर्दी काही कमी होताना दिसत नाही. दादरच्या भाजी बाजारात पहाटे साडेपाच वाजताच मोठी गर्दी दिसून आली. आश्चर्याची बाब म्हणजे काल मध्यरात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू असूनही इथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी, बेशिस्त नागरिकांना हटकण्यासाठी पोलीसही अनुपस्थित होते. अशा गर्दीत ओमायक्रॉन संसर्ग बळावला तर राज्यावरील निर्बंध अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीच शिस्त पाळण्याची गरज आहे.
राज्यनिहाय ओमायक्रॉनची प्रकरणे :
महाराष्ट्र- एकूण प्रकरणे 108, आजारातून बरे झालेले : 42
दिल्ली- एकूण प्रकरणे 79, आजारातून बरे झालेले : 23
गुजरात - एकूण प्रकरणे 43, आजारातून बरे झालेले : 5
तेलंगणा- एकूण प्रकरणे 38, आजारातून बरे झालेले : 8
केरळ - एकूण प्रकरणे 37, आजारातून बरे झालेले : 1
तामिळनाडू- एकूण प्रकरणे 34, आजारातून बरे झालेले : 0
कर्नाटक- एकूण प्रकरणे 31, आजारातून बरे झालेले : 15
राजस्थान- एकूण प्रकरणे 22, आजारातून बरे झालेले : 19
हरियाणा - एकूण प्रकरणे 4, आजारातून बरे झालेले : 2
ओरिसा- एकूण प्रकरणे 4, आजारातून बरे झालेले : 0
आंध्र प्रदेश - एकूण प्रकरणे 4, आजारातून बरे झालेले : 1
जम्मू आणि काश्मीर - एकूण प्रकरणे 3, आजारातून बरे झालेले : 3
बंगाल - एकूण प्रकरणे 3, आजारातून बरे झालेले : 1
उत्तर प्रदेश - एकूण प्रकरणे 2, आजारातून बरे झालेले : 2
चंदीगड - एकूण प्रकरणे 1, आजारातून बरे झालेले : 0
लडाख- एकूण प्रकरणे १, आजारातून बरे झालेले : १
उत्तराखंड- एकूण प्रकरणे 1, आजारातून बरे झालेले : 0
इतर महत्त्वाच्या बातम्या: