Gym vs Diet : आजकाल वजन कमी करणे हा ट्रेंडपेक्षा कमी नाही. फॅशनेबल असण्यासोबतच तंदुरुस्त दिसणे हा देखील लोकांच्या छंदाचा भाग बनला आहे. फिटनेस फ्रीक होण्यासाठी लोकांनी डाएटपासून ते जिम रूटीनपर्यंत सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. खरे तर वाढलेले वजन कोणाचाही लुक खराब करण्याचे काम करते. वजन कमी करण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जात आहेत, ज्यामध्ये आहार आणि जिमवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. आता तंदुरुस्त राहण्यासाठी जिम की डाएट चांगलं असा प्रश्न पडतो. आहार नीट ठेवला तर जिमला जाण्याची गरज नाही, असा संभ्रम अनेकदा लोकांमध्ये असतो. दुसरीकडे, काहींना वाटते की जर तुम्ही जिमचे नियम पाळत असाल तर मग आहारावर इतके लक्ष का द्यावे? जिम किंवा डाएटमध्ये काय चांगले आहे घ्या जाणून.


वजनाबद्दल तज्ञ काय म्हणतात


तज्ञांच्या माहितीनुसार, जास्त वजनाचे प्रमाण बीएमआयवरून ठरवले जाते.  डब्ल्यूएचओच्या (WHO) मते, जर बीएमआय 25 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वजन वाढवणे गरजेचे आहे. जर बीएमआय 24 पेक्षा जास्त असेल तर त्याला ओव्हरवेट म्हणतात. पण जर बीएमआय (BMI) 30 च्या वर असेल तर ते लठ्ठपणा दर्शवते. वजन कमी करण्यासाठी आहार आणि शारीरिक तंदुरुस्ती या दोन्हींचा समन्वय आवश्यक आहे. वजन कमी करताना डाएट चांगला आहे की जिम रूटीन हे ठरवणे कठीण आहे. तज्ञांच्या मते, जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचे असेल तेव्हा तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करा. आहारात कॅलरीजसह इतर गोष्टींची काळजी घेतल्यास वजन वाढण्याआधीच नियंत्रणात ठेवता येते. जर तुम्ही जास्त वजन किंवा लठ्ठपणाचे शिकार झाला असाल तर तुम्ही जिममध्ये जाऊ शकता. परंतु या काळात आहारावर देखील लक्ष केंद्रित करा. तुम्ही जे खाता ते पचवण्यासाठी घरातल्या घरात शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे.


जिम टिप्स


ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते लठ्ठपणा हा एक प्रकारचा आजार आहे. ज्यामुळे शरीराला उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखीचा त्रास होतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिमला जाणे गरजेचे आहे, पण यासाठी योग्य ट्रेनर निवडा. जर तुम्हाला योग्य आहार घ्यायचा असेल तर डॉक्टर किंवा तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.


 


इतर महत्वाच्या बातम्या