Gurupaurnima 2022 : आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा (Gurupaurnima 2022) साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते. भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. 


दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. महाभारत, पुराणे लिहिलेल्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा दिवस. या वर्षी बुधवार, 13 जुलै 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी गुरुंचे पूजन केले जाते. वेद व्यासांच्या जन्मामुळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी व्यास जयंतीही साजरी केली जाते. 


गुरुपौर्णिमेचा शुभमुहूर्त : 


हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा बुधवार 13 जुलै रोजी पहाटे 04 वाजून 01 मिनिटांनी सुरु होईल. तर समाप्ती बुधवारीच 13 जुलै रोजी रात्री 12 वाजून 08 मिनिटांनी होईल. त्यामुळे 13 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी होईल


गुरुपौर्णिमा प्रारंभ 13 जुलै बुधवार पहाटे 04 वाजून 01 मिनिटे
गुरुपौर्णिमा समाप्ती 13 जुलै बुधवारी सकाळी 12 वाजून 08 मिनिटे.


गुरुपौर्णिमेचे महत्त्व : 


गुरुपौर्णिमाचा संदर्भ हा प्राचीन भारताच्या इतिहासात सापडतो. आपल्या भारतात गुरु-शिष्य परंपरेला खूप मोठी परंपरा आहे. या दिवशी व्यासमुनींनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पूर्ण केले होते अशी मान्यता आहे. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.


भारतात गुरुला ब्रम्हा, विष्णू आणि महेशाचं रुप समजलं जातं. गुरु हा साक्षात परब्रमह्म असल्याचं सांगितलं जातं. त्या निमित्ताने देशभरातील शाळांत हा सण साजरा केला जातो. या वर्षी गुरुपौर्णिमा ही 24 जुलैला साजरी करण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, त्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुप्रति सन्मान व्यक्त करतात. 


व्यास ऋषींनी महाभारत या महाकाव्यासोबत इतर सहा शास्त्रांची आणि 18 पुराणांची निर्मिती केली होती. प्राचीन काळापासून त्यांच्या या निर्मितीचे ज्ञान भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात येतं. या व्यतिरिक्त व्यासांनी श्रीमद भागवत पुराणाची निर्मिती केली आहे. त्यामध्ये त्यांनी विष्णूच्या अवतारांचे वर्णन केलं आहे. या सर्वांचे ज्ञान त्यांनी आपल्या शिष्यांना पौर्णिमेच्या दिवशी दिलं होतं. त्याचे स्मरण म्हणून या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.


महत्वाच्या बातम्या :