Green Vegetable Juice For Glowing Skin : सुंदर आणि निरोगी त्वचा असावी ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु त्वचेची काळजी घेणं म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य उत्पादनं (Beauty Products) वापरणं इथपर्यंतच मर्यादित नाही, तर हे पूर्णपणे तुमच्या खाण्यापिण्याशी संबंधित आहे. यासाठी न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी हिरव्या भाज्यांच्या ज्युसची रेसिपी दिली आहे, ज्यामुळे तुमच्या त्वचेची चमक वाढू शकते. हिरव्या भाज्यांचा ज्युस (Green Vegetable Juice) प्यायल्याने तुम्हाला चेहऱ्यावर आश्चर्यकारक परिणाम दिसेल. त्यासाठी या हिरव्या भाज्यांचा रस कसा बनवायचा हे पाहूया.


चमकदार त्वतेसाठी हिरव्या भाज्यांच्या ज्युसची रेसिपी


साहित्य


एक काकडी
अंदाजानुसार थोडी कोथिंबीर
पुदिन्याची काही पानं
1 आवळा
1/2 टीस्पून - जिरे पावडर
1/2 टीस्पून - लिंबाचा रस
1 ग्लास - पाणी


हे सर्व मिक्सरमध्ये घालून एकजीव करुन घ्यावे आणि तयार रस किमान दोन आठवडे नियमित प्यावा. यामुळे तुमची त्वचा आतून उजळेल.


कसा फायदेशीर आहे हिरव्या भाज्यांचा रस?


भाज्यांच्या रसामध्ये भरपूर जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारु शकतात. याव्यतिरिक्त भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते, जे कोलेजन उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे, जे त्वचा मजबूत, हायड्रेटेड आणि तरुण ठेवते. व्हिटॅमिन सी अँटिऑक्सिडंट म्हणून देखील काम करते, जे त्वचेला सूर्याच्या हानीकारक किरणांपासून आणि पर्यावरणातील प्रदूषणापासून वाचवते. भाज्यांच्या रसामध्ये (Vegetable Juice) असलेले आणखी एक महत्त्वाचे पोषक तत्व म्हणजे पोटॅशियम, जे शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन नियंत्रित करते.


त्वचेच्या आरोग्यासाठी पुरेसं हायड्रेशन आवश्यक असतं आणि भाज्यांच्या रसातील (Vegetable Juice) पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने त्वचा हायड्रेटेड आणि मऊ राहण्यास मदत होते. हिरव्या भाज्यांचा रस प्यायल्याने तुमचं एकंदर आरोग्य सुधारु शकतं. त्वचा देखील त्यामुळे निरोगी राहते. रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी, पचनास मदत करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी देखील हिरव्या भाज्यांचा रस उपयुक्त ठरतो.


चमकदार त्वचेसाठी या गोष्टी लक्षात ठेवा


पोषणतज्ज्ञांच्या मते, निरोगी त्वचा मिळवण्यासाठी संतुलित आहार (Balanced Diet) घेणं गरजेचं आहे. चांगल्या त्वचेसाठी योग्य दिनक्रम (Proper Routine) आणि पुरेसं हायड्रेशन (Adequate hydration) देखील आवश्यक आहे. त्वचेवर आतून चमक (Glowing Skin) येण्यासाठी दिनचर्येत पुरेशा झोपेसह (Adequate Sleep) भाज्यांचे रस (Vegetable Juice), संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचा (Daily Exercise) समावेश केला पाहिजे.


हेही वाचा:


Skin Care: चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने तोंड पुसताय? असं करत असाल तर थांबा; नाहीतर चेहऱ्यावरील होतील 'हे' परिणाम