Gluten Free Benefits : सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये पाहिलं तर तरूणाई आहारात ग्लूटेन फ्री (Gluten Free) चा जास्त वापर करू लागले आहेत. ग्लूटेन फ्री खाल्ल्याने वजन कमी (Weight Loss) होण्यास आणि पचनास मदत होते. ग्लुटेनमुक्त आहारानेही मधुमेह नियंत्रित ठेवता येतो.
ग्लूटेन हे गहू, बार्ली आणि राईमध्ये आढळणारे प्रोटीन आहे. ज्या लोकांना ग्लूटेनची ऍलर्जी आहे त्यांनी गव्हापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी देखील ग्लूटेन सोडतात. यामुळे शरीरात ऊर्जा राहते आणि सांधेदुखीतही आराम मिळतो. ग्लूटेन फ्री फूड खाण्याचे नेमके काय फायदे आहेत ते जाणून घ्या.
ग्लूटेन फ्री खाण्याचे फायदे :
1. वजन कमी करा : ग्लूटेन फ्री पदार्थांमुळे वजन झपाट्याने कमी होते. ग्लुटेन मुक्त आहारामध्ये तुम्ही जंक फूड किंवा बाहेरचे खाणे टाळता. त्यामुळे शरीरात नको असलेले पदार्थ टाळता येतात. आणि कॅलरीज मर्यादित प्रमाणात मिळतात. ग्लूटेन मुक्त धान्यांमध्ये ओट्स, कॉर्न आणि क्विनोआ यांचा समावेश होतो. अशी अनेक धान्ये खाल्ल्याने वजन कमी होते.
2. ऊर्जा टिकवून ठेवा : गहू खाल्ल्याने शरीरात आळस सुरू होतो. परंतु, ग्लूटेन फ्री खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा पातळी चांगली राहते. अशा प्रकारचे अन्न खाल्ल्याने शरीरातील थकवा आणि आळस निघून जातो. त्यामुळे तुम्हाला सक्रिय वाटते.
3. पचन सुधारा : जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील जसे की गॅस, बद्धकोष्ठता, पोट फुगणे किंवा जुलाब, तर अन्नामध्ये ग्लूटेन मुक्त गोष्टींचा समावेश करा. अनेक संशोधनातून असे आढळून आले आहे की, ग्लूटेन मुक्त आहारामुळे या समस्यांमध्ये आराम मिळतो.
4. सांधेदुखीत आराम : ज्या लोकांना सेलियाक रोग आहे म्हणजेच ग्लूटेनची ऍलर्जी आहे, त्यांना सूज आणि दुखण्याची समस्या जास्त असते. अशा लोकांना सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मनगटदुखीचा त्रास सुरू होतो, परंतु ग्लूटेनमुक्त आहार घेतल्यास अशा वेदनांमध्ये आराम मिळतो.
5. त्वचा उजळते : ग्लूटेनची ऍलर्जी असल्यास त्याचा त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे त्वचेवर फोड येतात. ग्लूटेन फ्री फूड खाल्ल्यास फोडांची समस्या दूर होते आणि त्वचाही निरोगी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या