IND vs SA, Playing 11 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) सामन्याला रांचीच्या मैदानात सुरुवात झाली असून दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. दोन्ही संघानी आपआपले अंतिम11 देखील जाहीर केले आहेत. दोन्ही संघानी प्रत्येकी दोन-दोन बदल केले असून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाची प्रकृती ठिक नसल्यामुळे तो संघात नसल्याचं दिसून आलं आहे. त्याच्याशिवाय फिरकीपटू तबरजे शम्सीही संघात नसल्याचं दिसुून आलं आहे. दुसरीकडे भारती संघातही रवी बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड हे देखील संघात नसल्याचं समोर आलं आहे. दक्षिण आफ्रिका संघात रीझा हेंड्रिक्स आणि ब्योर्न फॉर्च्युइन यांना संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात आलेल्या वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमदला संधी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

कसे आहेत दोन्ही संघ?
 
भारतीय संघ -

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर.

दक्षिण आफ्रिका संघ - जनेमान मलान, क्विंटन डी कॉक, केशव महाराज (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरीक क्लासेन, डेविड मिलर, वेन पारनेल, एनरिक नॉर्टेजे, कागिसो रबाडा आणि ब्योर्न फॉर्च्युइन 

Continues below advertisement

 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका Head to Head

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa ODI Record) यांच्यात आतापंर्यंत 88 एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी 50 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, दक्षिण आफ्रिका संघाला 35 सामने जिंकता आले आहेत. यातील तीन सामने अनिर्णित देखील सुटले आहेत. 

 हे देखील वाचा-