Ghee chai trend: तुपातले अनेक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील पण आजकाल समाजमाध्यमांवर अनेक कलाकार त्यांच्या  सौंदर्याचं कॉफीत तुप घालत असल्याचं सांगतायत. वजन कमी करण्यासाठी तुपाच्या कॉफीचं सेवन करत असल्याचं अनेकजण सांगत आहेत. तुपाचा चहा किंवा तुपाची कॉफी आरोग्यदायी असल्याचंही यात सांगण्यात येतं. मासिक पाळीत आराम मिळावा यासाठी तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हावा यासाठी चमचाभर तुप टाकण्याचा सल्ला सोशलमिडियातून अनेकजणी देताना दिसतात. हे कितपत फायदेशीर आहे? तुपातला चहा किंवा कॉफीचा प्रकार नक्की काय आहे? चला जाणून घेऊया..


सध्या इन्स्टाग्रामवर तुम्ही अनेक कलाकारांच्या पोस्टवर तसेच अनेक कंटेट क्रिएटर यांच्या अकाऊंटवर चहा बनवत असल्याचे व्हिडिओ दाखवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे चहा किंवा कॉफी बनवल्यानंतर त्यात ते चमचाभर तूप टाकत आहेत. मासीक पाळीत होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो असं यातील अनेकांचं मत आहे. यासाठी अनेकजण या चहा, कॉफीची रेसिपीही शेअर करत आहेत. कृती सेनॉनसह अनेक कलाकारच नाही तर आहारतज्ञही ही कॉफी पित असल्याचं सांगत आहेत. 


तुपात बनवलेला चहा खरंच फायद्याचाय का?


तुपापासून बनवलेला चहा किंवा कॉफी खरंच फायद्याची आहे का? याविषयी अनेकजण पोस्ट करत असले तरी काही आहारतज्ञांच्या मते तुपापासून बनवला जाणारा चहा हा फायदेशीर आहे. चमचाभर तुपात गुड फॅटस आणि शरिराला आवश्यक संयुगे असतात. जे उठल्याउठल्या शरिरात ऊर्जा निर्माण करतात., पचनाशी संबंधित समस्यावर हा रामबाण उपाय असल्याचंही अनेकजण सांगताना दिसत आहेत.


 






कसा बनवतात हा चहा?


या चहा कॉफीच्या सर्वांच्या रेसिपी वेगवेगळ्या आहेत. काही जण काढ्यासारखा चहा बनवून त्यात शेवटी अर्धा चमचा साजूक तूप टाकतात. काही जणांना चहा किंवा कॉफीमध्ये दुध टाकायचे नसेल तर काळा चहा किंवा ब्लॅक कॉफीत शेवटी चमचाभर तुप टाकलं जातं.  हा चहा घेण्याचं तुमचं उदिष्ट काय यावर याची रेसिपी आहे. जर पचनासाठी हा चहा किंवा कॉफी घेत असाल तर त्यात कोऱ्या चहात चिमुटभर ओवा, दालचिनीचा तुकडा असा काढा करून शेवटी त्यात तूप टाकलं जातं. काही जण दुधाच्या चहातही तुप टाकताना दिसतात. 


 




मासिक पाळीच्या वेदना होतात कमी


तुपातला चहा पिल्यानं मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होऊन दुखण्यावर आराम पडतो असंही काही जणांचं म्हणणं आहे. इन्स्टाग्रॅमवर याबाबत अनेकजण पोस्ट करत असून रकुल प्रीत, कृती सेनॉन अशा कलाकारांसह अनेक आहारतज्ञांनीही याबाबत पोस्ट केल्या आहेत.