Prithviraj Chavan : पुण्यामध्ये सध्या हिंजेवाडीमध्ये येणाऱ्या 37 कंपन्या बाहेरच्या राज्यांत गेल्या आहेत. कारण त्यांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे. सेमी कंडक्टरचे चार युनिट राज्यामध्ये येणार होते. मात्र, त्यामधील 3 युनिट गुजरातला गेले आहेत आणि एक आसाममध्ये गेला असल्याचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 






राज्यात आयफोनचं एकही युनिट नाही 


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आयफोन तयार करण्याचे एकही युनिट राज्यामध्ये नाही. स्वतः केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी देखील म्हंटलं होतं की, देशातील 55 टक्के आयफोन मुंबईत तयार होतील. मात्र, एकही युनिट राज्यात आलेलं नाही.


विधानसभेला दारूण पराभव समोर दिसत आहे 


दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने काल शेती उत्पादनांवर निर्णय घेतले आहेत. कांदा आणि बासमती तांदुळबाबत निर्णय झाला आहे. किमान निर्यात शुल्क कमी केलं आहे. हरियाणामध्ये बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणत होतो. कांदा आणि बासमती तांदूळ यावर निर्यात शुल्क कमी करण्याचास निर्णय घेतला आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आणलं आहे. विधानसभेला दारूण पराभव समोर दिसत आहे म्हणून यांनी निर्णय घेतला आहे. हे राजकीय निर्णय आहेत. 






कधीच केंद्र सरकारला चार ओळीच पत्र लिहिलं नाही


शेतकऱ्यांची मुलं म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कधीच केंद्र सरकारला चार ओळीच पत्र लिहिलं नाही. राज्यांत सोयाबीन पीक काढायला आलं आहे. सोयाबीनला 6 हजार भाव द्या अशी मागणी आहे. स्वतः पाशा पटेल जे सरकारमध्ये आहेत त्यांनी देखील हीच मागणी केली होती. राज्यांत 50 टक्के लोक शेतीवर उदरनिर्वाह करतात. सध्या दरडोई उतपन्न कमी होत आहे. त्यामुळे उद्योग आणि सेवा क्षेत्राकडे वळायला हवं. मात्र, हे करण्यासाठी सरकारला अपयश आलं असल्याची टीका त्यांनी केली. 


183 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय 


राज्यात 183 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. महाविकास आघाडीमधील जागावाटप लवकरच संपेल. खूप कमी वाद आमच्यात आहेत. त्यावर देखील तोडगा लवकरच निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


इतर महत्वाच्या बातम्या