How To Get Rid Of Body Hair : स्त्रिया आणि पुरुष दोघांच्याही शरीरावर केस असणे सामान्य आहे. शरीरावरील अनावश्यक केस काढणे खूप वेदनादायक आणि वेळ घेणारे ठरते. वॅक्सिंग, शेव्हिंग आणि थ्रेडिंग हे शरीरातील केस काढण्याचे सर्वात सामान्य मार्ग आहेत. काहीवेळा वॅक्सिंगनंतर त्वचेवर लाल ठिपके आणि चट्टेही येतात. विशेषत: संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना सौम्य वेदना जाणवतात. तर शेव्हिंगमुळे कधीकधी रॅशेज उठतात. मात्र शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी या व्यतिरिक्त इतर अनेक पद्धती आहेत त्या जाणून घ्या.


1. हळदी आणि कच्च्या पपईची पेस्ट 
कच्ची पपई आणि हळदीची पेस्ट यावर उत्तम उपाय आहे. पपईमध्ये पपेन एंजाइम असते, जे केसांची वाढ कमी करण्यास मदत करते. याशिवाय हळदीमध्ये बॅक्टेरियाशी लढण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे ते संवेदनशील त्वचेसाठी चांगले कार्य करते. यासाठी थोडी कच्ची पपई बारीक करून घ्या, आता त्यात एक ते दोन चमचे हळद घाला. आता दोन्ही मिक्स करून पेस्ट तयार करून चेहरा आणि शरीरावर लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून एक किंवा दोनदा हे नियमितपणे करून पहा. शरीरावरील केसांची वाढ मंदावते.


2. बेकिंग सोडा आणि हळद
हळद हे अँटिऑक्सिडंट आहे, तर बेकिंग सोडा स्क्रबर म्हणून काम करते. हे दोन्ही घटक मिळून केसांची वाढ कमी करण्याचे काम करतात. वापरण्यासाठी, एक चमचा बेकिंग सोडामध्ये एक चमचा हळद पावडर मिसळा. थोडे पाणी घाला आणि साहित्य मिसळून घट्ट पेस्ट बनवा. लावल्यानंतर, हलक्या हातांनी मसाज करा आणि 15-20 मिनिटे सोडा. आता ते कोमट पाण्याने धुवा आणि कोरडे करा. 


3. दुध आणि कॉर्न फ्लोअर
शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी हा एक सोपा मास्क आहे. कॉर्नफ्लोर दुधात मिसळून याची घट्ट पेस्ट करुन वापरू शकता. यासाठी अर्धा कप कॉर्नफ्लोअरमध्ये एक छोटा कप दूध मिसळून पेस्ट बनवा. ज्या ठिकाणी केस काढायचे आहेत त्या ठिकाणी ही पेस्ट लावा. त्यानंतर ही पेस्ट 20 मिनिटे पूर्ण सुकू द्या. पेस्ट सुकल्यानंतर हलक्या हाताने गोलाकार स्क्रब करून पेस्ट काढा. यामुळे कोरड्या पेस्टसह अनावश्यक केसही निघतील. 


4. साखर, मध आणि लिंबापासू घरगुती वॅक्स
मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. तर, साखर त्वचेचे एक्सफोलिएट करून मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते आणि लिंबू एक ब्लीचिंग एजंट आहे. हातापायांवरील केसांपासून सुटका होण्यासाठी एका भांड्यात एक चमचा साखर, मध आणि लिंबू मिसळा. मेणासारखी पेस्ट होईपर्यंत हे मिश्रण गरम करा. हे मिश्रण तुम्ही वॅक्स म्हणून वापरू शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA