Ganeshotsav Fashion : बाप्पाचं आगमन आता सर्वत्र झालंय. देशात ठिकठिकाणी गणेशोत्सव निमित्त बाप्पाची पूजा-अर्चना करत मोठा उत्साह पाहायला मिळतो. अशात अंबानी कुटुंबीयही (Ambani Family) मागे नाही, अंबानीचं घर म्हणजेच अँटिलियामध्ये (Antalia) बाप्पा विराजमान झाला, आणि दीड दिवसानंतर त्याचं विसर्जनही वाजत गाजत करण्यात आले. यावेळी नेहमीप्रमाणे अनेक दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली. काही महिन्यांपूर्वीच राधिका आणि अनंत अंबानी (Radhika Anant Ambani) यांचं लग्न झालं. त्यावेळेस कुटुंबियातील सदस्यांचे लूक्स खूप चर्चेत होते. यंदाही गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2024) दरम्यान अंबानी परिवारातील महिलांचे लूक्स चर्चेत आहेत. ज्यापैकी विशेष म्हणजे नीता अंबानी (Neeta Ambani) यांचा गणेशोत्सव लूक खास चर्चेत आहे. यावेळी नीता अंबानी जेव्हा सून राधिकाचा हात धरून मीडियासमोर आल्या. तेव्हा त्यांच्या रॉयल लूकने एका नजरेत सर्वांचे मन जिंकले. तेव्हा तिथे एकच चर्चा झाली, ती म्हणजे, वयाच्या साठीतही आपल्या सुनेला त्यांनी सौंदर्याच्या बाबतीत मागे टाकले, पाहुयात त्यांचा एक लूक..


 


सौंदर्याबाबतीत वयाच्या साठीत सुनेलाही टाकले मागे...!


अब्जाधीश कुटुंबातील श्रीमती नीता अंबानी यांच्या संपत्तीशी स्पर्धा करणे जवळजवळ अशक्य आहे. पण आणखी एक गोष्ट आहे ज्याचा सामना करणे त्यांच्यासाठी कठीण आहे. नीता अंबानी यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. पण आजही, जेव्हा ती कोणत्याही कार्यक्रम प्रसंगी दिसतात, तेव्हा हे स्पष्ट होते की त्यांची फॅशन स्टाईल खरोखर कौतुकास्पद आहे. आता अँटिलिया येथे झालेल्या गणेश उत्सवाचेच उदाहरण घ्या, जिथे त्यांनी जुने दागिने आणि नवीन साडीचे कॉम्बिनेशन करून स्वतःच्या सुनेलाही मागे टाकले.


 


सुनेचा हात धरून नीता आल्या मीडियासमोर


नीता अंबानी नेहमीच त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी आणि त्यांच्या सुनांचे आईसारखे लाड करण्यासाठी ओळखल्या जातात. याची झलक त्यांनी गणेशोत्सवातही दाखवली. नीता जेव्हा विशेषत: मीडियासाठी बाहेर आल्या, तेव्हा सून राधिकाचा हात धरून घेऊन आल्या. या सुंदर क्षणापासून, नीता यांच्या रॉयल लूकने एका नजरेत मन जिंकले. नीता अंबानी यांनी या कार्यक्रमासाठी जांभळ्या रंगाची बांधणी सिल्क साडी निवडली होती. रंगीबेरंगी प्रिंट्सने बनवलेले मोर, पाने आणि फुलांचे आकार साडीचे सौंदर्य वाढवत होते. बॉर्डरला अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्यावर काचा आणि धाग्याचे काम करण्यात आले. हेमलाइनवर स्टार वर्क जोडले गेले. इतकंच नाही तर त्यावर गुलाबी रंगाचे टिसेल्सही जोडलेले होते. या साडीत नीता अंबानींचा प्रेमळ स्वभाव आणि सौंदर्य एकाच वेळी दिसले.


 




 


नीता अंबानीचं सुनेवर प्रचंड प्रेम!


खरं तर, नीता अंबानी साडीमध्ये इतक्या सुंदर दिसत होत्या की अशी साडी प्रत्येक स्त्रीला तिच्या कलेक्शनमध्ये ठेवायला आवडेल. साडी आणि ब्लाउजच्या कलर ब्लॉक कॉम्बिनेशनने लूक अधिक खुलून दिसत होता. निळ्या रंगाच्या साडीसोबत लाल रंगाचा ब्लाउज अप्रतिम दिसत होता. साडीच्या बॉर्डरवर अगदी तशीच प्रिंट आणि एम्ब्रॉयडरी होती.



नवीन साडीसोबत जुने दागिन्यांची सौंदर्यात भर


नीता अंबानींची साडी नवीन ट्रेंडची होती, तर त्यांनी घातलेले दागिने यापूर्वीही घातले होते. नीता अंबानींच्या गळ्यातील मोत्याचा हार त्यांनी यापूर्वी NMACC कार्यक्रमात परिधान केला होता. आकाश अंबानीच्या लग्नात त्यांनी हिरे आणि मोत्यांनी सजवलेले डँगलर्स घातले होते. त्याचप्रमाणे नीताच्या हातात दिसलेल्या जाड हिऱ्याने जडवलेल्या बांगड्याही यापूर्वी घातल्या होत्या. नीता अंबानी बऱ्याचदा टिकाऊ फॅशनचे उदाहरण देताना दिसतात आणि यावेळी देखील त्यांचा संदेश स्पष्टपणे पोहोचविला गेला आहे.


 


 






 


गणेश विसर्जनासाठीही नीता अंबानींचा लूक खास


 




 


हेही वाचा>>>


Ganeshotsav Travel: कलियुगात गणेशाने घेतला अवतार? एक असं गणेश मंदिर, जिथे 'कल्की' अवतारात होते गणेशाची पूजा, 'या' गोष्टी जाणून आश्चर्यचकित व्हाल


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )