एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2021 : आज गणेश चतुर्थी; जाणून घ्या गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त अन् विधी

Ganpati Sthapana Vidhi : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या जयघोषात आज घराघरांत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

Ganpati Sthapana Vidhi : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. घराघरांत भक्तीमय वातावर असेल. गणरायाची यथासांग पूजाअर्चा करुन गणरायाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. गणेशोत्सवाचे 10 दिवस अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडतील. त्यापूर्वी गणेश चतुर्थी दिवशी गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा शुभ मुहूर्त, विधी काय? याविषयी जाणून घेऊया...

गणरायाची स्थापना करण्यासाठी भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्यानं त्या दिवशी जमलं नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. तर एखाद्या वर्षी कोणत्याही कारणानं गणरायाची प्रतिष्ठापना करता आली नाही तर, पुढच्या वर्षी गणरायाची प्रतिष्ठापना करु शकता. यंदाच्या वर्षी पहाटेपासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी गरायाची स्थापना आणि पूजा करता येईल. उत्तम मुहूर्त म्हणून गणपतीची घरी पहाटे 4:50 पासून दुपारी 1:50 पर्यंत कधीही प्रतिष्ठापना करू शकतो. 

'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या जयघोषात बाप्पाची मूर्ती घराघरांत आणली जाते. दारात मुर्तीचे पाय धुवून, अक्षता अर्पण करुन औक्षण केलं जातं. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर मुर्तीची स्थापना केली जाते. गणरायाच्या स्थापनेसाठी सर्वात आधी पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरुन त्यावर मूर्ती ठेवली जाते. मुर्तीवर गंगाजल शिपडून देवाला जानवं घातलं जातं. सर्वात आधी गणरायाला पंचामृताने स्नान घालून केशर, चंदन, अक्षता, दुर्वा, फुले, दक्षिणा अर्पण केली जाते. त्यानंतर घरातील सर्व मंडळी गणरायाची पूजा करतात. आरती करुन बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.  

आपल्या श्रद्धेप्रमाणे घराघरांत दीड, पाच, सात आणि दहा दिवस गणरायाची सेवा केली जाते. या दिवसांमध्ये रोज बाप्पाची पूजा करुन त्याला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. शेवटच्या दिवशी जागरण करुन खेळ खेळले जातात. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषात बाप्पाला ठरलेल्या वेळी निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पाच्या आगमनाची प्रतिक्षा केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Shravan 2026 : भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी
भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी
Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget