Friendship Day 2024 : तुझी माझी यारी..अख्ख्या जगात भारी...फ्रेडशिप डे म्हणजेच मैत्रीदिन म्हटला की मनात कसा उत्साह असतो, आपलं आपल्या मित्र परिवारावर किती प्रेम आहे हे सांगण्याचा हा दिवस... तर मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. तसे वर्षातील 365 दिवस हे मैत्रीचे असतात. मात्र भारतासह विविध देशात ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. तर काही देशात 30 जुलैला हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी अनेकांचे वेगवेगळे प्लॅन बनतात. कोणाचे आऊटींगचे, कोणाचे पार्टीचे तर कोणाचे सरप्राईझ प्लॅन्स बनतात. या फ्रेंडशिप डेच्या दिवशी जर तुम्हाला तुम्ही स्वतःच्या हाताने फ्रेंडशिप बँड बनवायचा असेल आणि तो तुमच्या मित्रांना द्यायचा असेल तर तो कसा बनवायचा? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे अनोखं सरप्राईझ पाहून तुमचा मित्र/ मैत्रीण खूप खूश होईल, आणि तुमचं मैत्रीचं नातं घट्ट होईल.


 




मैत्रीतील प्रेम व्यक्त करण्याचा हा एक मार्ग


फ्रेंडशिप डे हा अशा मित्रांना समर्पित केलेला खास दिवस आहे. भारतात दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या निमित्ताने मित्रमंडळी एकमेकांना भेटवस्तू देतात आणि पार्टी करतात. एवढेच नाही तर फ्रेंडशिप डेच्या दिवशी मित्र एकमेकांच्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधतात. मैत्रीतील प्रेम व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. जरी तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन कुठेही फ्रेंडशिप बँड मिळू शकतो, परंतु जर तुम्ही तो स्वतः बनवला आणि तुमच्या मित्र किंवा मैत्रीणीला दिला तर त्यांनाही खूप आवडेल. यामुळे तुमच्या मित्राला विशेष वाटू शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगत आहोत, जे फॉलो करून तुम्ही स्वतःच्या हातांनी फ्रेंडशिप बँड बनवू शकता.





घरी फ्रेंडशिप बँड कसा बनवायचा?


आवश्यक साहित्य
रंगीत धागे किंवा फिती
सुई
कात्री
सरस
मोती


फ्रेंडशिप बँड बनवण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा


रंगीत धागा किंवा फित घ्या आणि तुमच्या मनगटाचे मोजमाप लक्षात घेऊन प्रथम कापून घ्या. हे लक्षात ठेवा की ते आवश्यकतेपेक्षा मोठ्या आकारात कापून घ्या, जेणेकरून फ्रेंडशिप बॅंड बनवण्यास कोणतीही अडचण येणार नाही.


आता सुईमध्ये धागा टाकून तयार करा.


आता रंगीबेरंगी मणी घ्या आणि त्यांना सुईच्या टोकावर ठेवा आणि खाली करा.


अशा प्रकारे त्या धाग्यात तुम्ही तुमच्या आवडीचे मोठे आणि छोटे मणी घाला.


जेव्हा संपूर्ण धागा मणींनी भरला जातो तेव्हा सुईला धाग्यापासून वेगळे करा.


यानंतर, धाग्याची दोन्ही टोकं एकत्र जोडून एक गाठ बांधा.


तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दुसरा छोटा धागा घेऊन धाग्याच्या टोकाला बांधू शकता.


 





फ्रेंडशिप बँड कोणत्या धाग्यापासून बनवता येतो?


घरी ठेवलेल्या रंगीबेरंगी कापूस किंवा रेशमी धाग्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे फ्रेंडशिप बँड बनवू शकता. 
यासाठी तुम्हाला तीन वेगवेगळ्या रंगाचे धागे घ्यावे लागतील. 
यासाठी तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर निवडू शकता. 
आता तीनही धागे मोठ्या आकारात कापून वेगळे करा. 
यानंतर, तिघांचे प्रत्येक टोक एकत्र बांधा. 
आता, तुम्ही त्यांना वेणीप्रमाणे विणू शकता. 
मित्रांसाठी हा सुंदर फ्रेंडशिप बँड काही मिनिटांत तयार होईल. 
तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमचे आवडते मोती त्यावर चिकटवून ते अधिक आकर्षक बनवू शकता.
 फ्रेंडशिप डेच्या दिवशी मित्राच्या मनगटावर बांधणे हे खास असेल


 


हेही वाचा>>>


Friendship Day 2024 Wishes : 'रक्ताची नसूनही रक्तात भिनते ती 'मैत्री'!' फ्रेंडशिप डे येतोय, मित्रपरिवाराला शुभेच्छा संदेश पाठवून दिवस बनवा खास..


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )