Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी (Lord Shani) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. नवग्रहांमध्ये शनी (Shani Dev) हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. त्याचबरोबर शनी हा असा ग्रह आहे ज्याच्याकडे साडेसाती आणि ढैय्याचा अधिकार आहे. त्यामुळे आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला एकदा शनीच्या साडेसातीचा आणि ढैय्याचा सामना करावा लागतो. शनी जवळपास अडीच वर्षात राशी परिवर्तन करतात. त्याचबरोबर शनी वेळोवेळी नक्षत्र परिवर्तन करतात. 


6 एप्रिल 2024 रोजी शनी गुरुच्या नक्षत्र पूर्वाभाद्रपदात प्रवेश करणार आहे. आता याच राशीत बदल करणार आहेत. त्यामुळे काही राशीच्या लोकांना याचा बंपर लाभ मिळणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 


ज्योतिष शास्त्रानुसार, पूर्वाभाद्रपद नक्षत्र 27 नक्षत्रात 25 व्या नक्षत्रात आहे आणि याचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे. पंचांगानुसार, कर्मफळदाता शनी 18 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजून 3 मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आणि 3 ऑक्टोबरपर्यंत याच राशीत असणार आहेत. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचं पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रथम चरणात असणार आहे. त्यामुळे हा काळ मिथुन राशीसाठी लाभदायक असणार आहे. या दरम्यान तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला शारीरिक आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल. कुटुंबात चाललेले वाद संपुष्टात येतील. आयुष्यात आनंद असेल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक असणार आहे. या राशीत शनीच्या साडेसातीचा अंतिम चरण सुरु आहे. शनीमुळे या राशीच्या लोकांना चांगले फळ मिळणार आहे. या दरम्यान तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याबाबत ज्या तुमच्या तक्रारी होत्या त्या हळूहळू कमी होतील. तसेच, तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. 


तूळ रास (Libra Horoscope)


शनीचं पूर्वाभाद्रपद नक्षत्र पहिल्या चरणात आहे. तुमच्या करिअरमध्ये ज्या अडचणी येत होत्या त्या आता संपुष्टात येतील. नोकरीबरोबरच धनप्राप्तीसाठी तुमचे अनेक मार्ग खुले होतील. तसेच, मित्रांच्या सहयोगाने तुमची सगळी कामे सहज सोपी होतील. तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही. तुमच्या मनात जी इच्छा असेल तर पूर्ण होईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : आज सिद्धी योग, शश योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 'या' 5 राशींना होणार अपार धनलाभ, हा काळ समृद्धीचा