Friendship Day 2024 Wishes : मैत्रीला समर्पित हा दिवस ऑगस्टच्या पहिल्या रविवारी म्हणजेच 4 ऑगस्टला साजरा केला जात आहे. आपल्या खास मित्रांचे आभार मानण्याचा आणि आपल्या जीवनातील त्यांचे विशेष स्थान दर्शविण्याचा हा दिवस आहे. हा दिवस लोक मित्रांसोबत साजरा करतात. मैत्रीदिन साजरा करण्यासाठी लोक विविध प्लॅन्स करतात, एकमेकांना भेटतात, हँग आउट करतात, चित्रपट पाहतात, पार्टी करतात आणि भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त करतात, परंतु यापैकी कोणतेही नियोजन करणे शक्य नसल्यास, प्रेमाने भरलेले संदेश पाठवून आपल्या मित्राचा दिवस खास बनवू शकता.



भारतात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा करतात 'मैत्रीदिन'


अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिन दरवर्षी 30 जुलै या दिवशी साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. काही देशात 30 जुलै रोजी साजरा केला जातो, तर काही देशात हा दिवस ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो, ज्यात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती तसेच भारत यांचा समावेश आहे. मैत्री दिन रविवारी असल्याने मित्रपरिवाराला हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी है मैत्री संदेश, सुविचार तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. मग येत्या फ्रेंडशिप डे ला आपल्या मित्रपरिवाराला हे मेसेज, शुभेच्छा नक्की पाठवा.


 


फ्रेंडशिप डे 2024 शुभेच्छा, संदेश मित्रपरिवाराला नक्की पाठवा


 


मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री  - पु. ल. देशपांडे



जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात 
घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.



मित्र केवळ अलंकाराप्रमाणे सौंदर्य वाढविणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,
दैवानेच लाभतात… - व.पू. काळे


 


मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी 
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी



मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता 
समोरच्याच होऊन जाणं



जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही



मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात


 


मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय 
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही



कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना..
तर सारी दुनिया सलाम करते



मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे 
बोलू शकतो, रागावू शकतो आणि आपलं
मन हलकं करू शकतो, ती म्हणजे जिवलग मैत्री..


 


मैत्रीची परीक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे - महात्मा गांधींचे विचार



मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल, तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात - अब्राहम लिंकन



मैत्री.. एक भास जो कधीही दुखावत नाही आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही 



कुठलंही नातं नसताना आयुष्यभर साथ देते ती मैत्री 


वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध, फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध… हॅपी फ्रेंडशिप डे!!!


मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणिव, कारण या नात्याने भरून निघते आयुष्यातील उणीव… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!


शब्दांपेक्षा सोबतीत जास्त सामर्थ्य असतं, मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असतं. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!


असं नातं जे नकळत निर्माण होतं, आयुष्यभरासाठी लक्षात राहतं आणि जगात सर्वात श्रेष्ठ असतं. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!


रक्ताची नसूनही रक्तात भिनते ती मैत्री…. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!


जीवन आहे तर आठवणी आहेत, आठवण आहे तर भावना आहेत, भावना तिथेच आहे जिथे मैत्री आहे…. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


एकमेकांना भेटण्याची दोघांना आस आहे, आपल्या मैत्रीमध्ये काही तरी खास आहे. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


मैत्री असावी पाण्यासारखी निर्मळ, दूर असूनही सर्व काही स्वच्छ पणे सांगणारी… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


मित्र नेहमी स्तुती करणारे नसावेत, प्रसंगी आरशाप्रमाणे गुणदोष दाखवणारेही असावेत. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा, मुखवट्याच्या या जगामध्ये खात्रीचा विसावा. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


 


 


हेही वाचा>>>


Friendship Day च्या तारखेवरून लोकांमध्ये संभ्रम! भारतात कधी साजरा केला जातो हा दिवस? गूगलवर सर्वाधिक सर्चिंग


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )