Friendship Day 2024 Gifts : मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा... तुझी-माझी दोस्ती, अख्ख्या जगात भारी...खरंच मैत्रीचा नुसता हात जरी खांद्यावर असला तरी आधार वाटतो...समाधान मिळतो. याच मैत्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे येत्या रविवारी म्हणजेच 4 ऑगस्टला साजरा होणार आहे. भारत, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, मलेशिया यांसारख्या देशांमध्ये दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे हा मित्रांना समर्पित केलेला एक खास दिवस आहे. हा दिवस आपल्या मित्राबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. मित्रांसोबत वेळ घालवून, तसेच त्यांना अनोख्या आणि उपयुक्त भेटवस्तू देऊन तुम्ही हा दिवस खास बनवू शकता.
मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान नातं...
मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान नातं असते. काही गोष्टी अशा असतात, ज्या आपण आपल्या आई-वडील आणि भावंडांसोबत शेअर करू शकत नाही, पण त्याच गोष्टी आपण मोठ्या धैर्याने आपल्या मित्रांना सांगतो. आता अशा खास नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. काही देशांमध्ये 30 जुलै रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो, तर भारत, मलेशिया, यूएई आणि अमेरिकेत हा दिवस ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. 2024 मध्ये यंदा 4 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल. हा दिवस तुमच्या खास मित्रांचे आभार मानण्याचा दिवस आहे, जे प्रत्येक सुख-दु:खाच्या क्षणी तुमच्या पाठीशी उभे राहिले, निस्वार्थपणे तुम्हाला साथ दिली आणि तुमचे सहकारी राहिले. त्यांचे आभार मानण्यासाठी एक दिवस पुरेसा नसला तरी ही संधी हातून जाऊ देऊ नका. तुम्ही मित्रांसोबत आउटिंग, पार्टी, मूव्ही डेट प्लॅन करू शकता आणि जर तुम्ही तुमच्या मित्रापासून दूर राहत असाल तर तुम्ही त्यांना एक सुंदर भेट देऊन त्यांचा दिवस संस्मरणीय बनवू शकता.
Personalized फोटो फ्रेम
तुमच्या दोघांचा चांगला फोटो असेल तर तुम्ही तो फ्रेम करून तुमच्या मित्राला देऊ शकता. जे ते त्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकतात. या फोटो फ्रेमच्या माध्यमातून तुम्ही जवळ नसलो तरीही जवळच राहाल. एका चांगल्या फोटोऐवजी, आपण एक आकर्षक फोटो फ्रेम देखील मिळवू शकता.
फोटो बूक
फोटो फ्रेमपेक्षा एक चांगला पर्याय म्हणजे फोटो बुक किंवा अल्बम. तुम्ही तुमच्या दोघांचे सर्व प्रकारचे फोटो प्रिंट करून घेऊ शकता आणि त्यातून एखादे पुस्तक किंवा अल्बम तयार करू शकता. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. हा ऑप्शन असा आहे की, तो पाहिल्यानंतर तुमच्या मित्राला आनंद होईल, याची खात्री आहे.
डेकोरेशन प्लांट
जर तुम्ही काही विचारपूर्वक गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही डेकोरेशन प्लांट देऊ शकता. जे ते त्यांच्या आवडीच्या ठिकाणी ठेवू शकतात. अशी अनोखी भेट मिळाल्यानंतर तुमचा मित्र नक्कीच आनंदी होईल.
हेही वाचा>>>
Friendship Day 2024 Wishes : 'रक्ताची नसूनही रक्तात भिणते ती 'मैत्री'!' फ्रेंडशिप डे येतोय, मित्रपरिवाराला शुभेच्छा संदेश पाठवून दिवस बनवा खास..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )