Horoscope Today 02 August 2024 : पंचांगानुसार, आज 02 ऑगस्ट 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


वैवाहिक जीवनात थोडे ताणतणाव वाढवणारा दिवस असला तरी उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने चांगली फळे मिळतील. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


आज वारा येईल तशी पाठ फिरवाल. कुटुंबामध्ये घेतलेला कोणताही निर्णय तोलून मापून घ्यावा लागेल.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


दूरदृष्टीने न घेतलेला निर्णय हानिकारक होऊ शकतो वैवाहिक जीवनात छोटी मोठी वादळे मन अस्वस्थ करतील.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


आज जास्तीत जास्त तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. पैशाचे सोंग आणता येणार नाही. त्यामुळे पैशांचे कधीही सोंग आणू नका.


सिंह रास (Leo Horoscope Today)


कोणत्याही व्यवहार करताना स्वतःचा फायदा लक्षात घेऊन व्यवहार करावा. महिलांना थोडा मनस्ताप होईल. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


संततीसाठी एरवी पेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी नवीन मार्गाचा अवलंब करावा लागेल. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


तुमच्यातील कलेला वाव मिळेल. काहीतरी नवे करण्याची उर्मी मनात जागेल आणि त्या दृष्टीने पावले  टाकाल.


वृश्चिक रास  (Scorpio Horoscope Today)


जीवनासंबंधी एकंदर तुमचा जो दृष्टिकोन आहे त्यावर परिणाम होईल. महिलांची सौंदर्य अभिरुची वाढेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


कौटुंबिक जीवनात भावनिक पातळीवर निर्णय घ्याल. उत्साहाने आनंदी वृत्तीमुळे सहवासातील इतर व्यक्तींनाही स्फूर्ती द्याल. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


प्रत्येक बाबतीत चोखंडपणा आणि आवडीनिवडी जास्त ठेवाल. स्त्रियांना घरातील व्यक्तींशी मिळते जुळते घ्यावे लागेल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


पराक्रम आणि प्रसिद्धी हातात हात घालून जातील. महिला परिस्थितीचा उत्कृष्ट निरीक्षण करतील. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. शुल्लक कारणावरून वाद वाढवण्याची प्रवृत्ती राहील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Guru Gochar : 2025 पर्यंत 'या' 3 राशी राहतील टेन्शन फ्री; लवकरच गुरु ग्रह चालणार वक्री चाल