एक्स्प्लोर

Home Care Tips : फरशी पुसल्यानंतरही चिकटच राहते? 'या' सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत चमकवा घर

Sticky Tiles Solutions : फरशी पुसल्यानंतरही चिकट आणि अस्वच्छ वाटते? या समस्येमागील मुख्य कारणे आणि फरशी पुन्हा स्वच्छ अन् चमकदार करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घ्या.

Tile Cleaning Tips : घरातील फरशी पुसल्यानंतर जेव्हा ती एकदम स्वच्छ, चमकदार आणि पायाला गुळगुळीत वाटते, तेव्हा मन प्रसन्न होते. मात्र, अनेक घरांमध्ये फरशी पुसल्यानंतरही परिस्थिती वेगळीच असते. कोपरा न कोपरा स्वच्छ करूनही फरशीवर एक प्रकारचा चिकटपणा कायम राहतो. कधी पायाला फरशी चिकट लागते, तर कधी वाळल्यानंतर त्यावर पुन्हा धुळीचा थर जमा होतो.

तुमच्याही घरात कापडाने फरशी स्वच्छ केल्यानंतरही अशीच वाटत असेल, तर त्यामागे फक्त घाण हेच एकमेव कारण असेल असे नाही. अनेकदा आपली सफाई करण्याची चुकीची पद्धत फरशीवर असा थर सोडते, ज्यामुळे ती स्वच्छ करूनही चिकट वाटते. ही समस्या नेमकी का निर्माण होते आणि त्यावर काय उपाय करता येतील, ते जाणून घेऊया.

Why Tiles Stay Sticky : पुसल्यानंतरही फरशी चिकट का होते?

क्लीनरचा उरलेला भाग : फरशी चिकट होण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपण वापरत असलेला फ्लोअर क्लीनर. अनेक क्लीनर्समध्ये साबण किंवा मेणयुक्त (वॅक्स) घटक असतात. फरशी पुसल्यानंतर हे घटक फरशीवरून पूर्णपणे साफ झाले नाहीत, तर पाणी वाळल्यावर त्याचा एक हलका थर तिथेच राहतो. हाच थर फरशीला चिकट बनवतो आणि त्यावर धूळ लवकर बसते.

घाण पाण्याने फरशी पुसणे : एकाच बादलीतील पाण्याने पूर्ण घरात फरसी पुसणे ही मोठी चूक ठरते. पाणी खूप घाण झाल्यानंतरही ते बदलले नाही, तर पाण्यातील माती, तेल आणि क्लीनरचे अवशेष पुन्हा फरशीवर पसरतात. त्यामुळे ती पुसताना गरजेनुसार पाणी बदलत राहणे आवश्यक आहे.

Floor Cleaning Mistakes : हार्ड वॉटर आणि चुकीच्या क्लीनरचा वापर

जड पाणी (Hard Water) : प्रत्येक ठिकाणचे पाणी सारखे नसते. काही ठिकाणच्या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे मिनरल्स जास्त असतात. असे पाणी क्लीनरसोबत मिसळून फरशीवर हलका थर तयार करते. पाणी सुकल्यानंतर हीच परत फरशीला चिकट किंवा डागाळलेली बनवते.

प्रत्येक फरशीसाठी एकच क्लीनर : टाइल्स, दगड (मार्बल किंवा ग्रॅनाइट), लाकूड किंवा लॅमिनेट अशा वेगवेगळ्या फरशीसाठी सफाईची पद्धत वेगळी असते. चुकीचा क्लीनर वापरल्यास फरशीचा वरचा पृष्ठभाग खराब होऊ शकतो आणि चिकटपणा वाढू शकतो.

How To Fix Sticky Residue : चिकट फरशी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

साध्या पाण्याने पुन्हा फरशी पुसा : जर फरशी चिकट वाटत असेल, तर आधी नेहमीप्रमाणे क्लीनरने पोंछा मारा. त्यानंतर स्वच्छ पाण्यात सुती कापड बुडवून आणि चांगलं पिळून पुन्हा एकदा संपूर्ण फरशी पुसून घ्या. यामुळे फरशीवरील क्लीनरचा अतिरिक्त थर निघून जाण्यास मदत होते.

क्लीनरचे प्रमाण योग्य ठेवा : जास्त क्लीनर वापरल्याने फरशी जास्त स्वच्छ होईल असा समज चुकीचा आहे. जास्त क्लीनर वापरल्यास त्याचे अवशेष फरशीवर साचतात. त्यामुळे नेहमी बॉटलवरील सूचनेनुसार योग्य प्रमाणातच क्लीनर पाण्यात मिसळा.

आधी झाडू मारा : फरशी पुसण्यापूर्वी फरशीवरील सुकलेली धूळ आणि माती झाडूने किंवा व्हॅक्यूम क्लीनरने पूर्णपणे साफ करा. यामुळे फरशी पुसताना माती इकडे-तिकडे पसरणार नाही.

शेवटी कोरड्या कपड्याने सुकवा :  फरशी पुसल्यानंतर ती कोरड्या कापडाने किंवा सुक्या मॉपने पुसून घेणे उत्तम मानले जाते. यामुळे पाण्यातील मिनरल्सचे डाग आणि चिकटपणा तयार होण्याची शक्यता शून्य टक्क्यांपर्यंत खाली येते.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
Hip Replacement: वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
Advertisement

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget