Fitness Tips : बदलत्या जीवनशैलीनुसार (Lifestyle) सध्या अनेक आजारांचा धोका वाढत चालला आहे. याच कारणास्तव प्रत्येकजण आपल्या फिटनेसकडे लक्ष देतोय. निरोगी, हेल्दी आणि फिट राहण्यासाठी अनेकदा लोक जिमचा पर्याय निवडतात. तरुणांमध्ये जिमला जाण्याची क्रेझही पाहायला मिळतेय. मुलं अॅब्स, सिक्स पॅक आणि बॉडी बनवण्यासाठी जिम (Gym) जॉईन करतात. तर, याऊलट मुलींना स्लिम फिगर हवी असते त्यामुळे त्या जिम जॉईन करतात. पण, जास्त जिम केल्याने तसेच, चुकीच्या पद्धतीने आणि योग्य वयात जिम न केल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हे तुम्हाला माहीत आहे का? 


खरंतर, जिमला जाऊन व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीरच आहे. पण, सध्याच्या काळात लहान मुलांमध्ये देखील जिमला जाण्याची क्रेझ वाढत चालली आहे. अशा वेळी जिमला जाण्याचं योग्य वय नेमकं कोणतं? हे पालकांना आणि मुलांना माहीत असणं गरजेचं आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


जिम जॉईन करण्याचं योग्य वय कोणतं? 


या संदर्भात फिटनेस हेल्थच्या म्हणण्यानुसार, जिममध्ये 16 वर्षांहून जास्त असलेल्या मुलांना हेव्ही वेट ट्रेनिंग दिलं जातं. याचं कारण म्हणजे 16 वर्षांहून कमी असलेल्या मुलांमध्ये हा़डांचा विकास होण्याची प्रक्रिया सुरु असते. यासाठीच हेव्ही वेट ट्रेनिंग करणं त्यांच्यासाठी योग्य वय नाही. पण, या दरम्यान 16 वर्षांखालील मुलं शरीराला फिट ठेवण्यासाठी काही एक्सरसाईझ नक्कीच करू शकतात. 


बॉडी ट्रेनिंग 


16 वर्षांआधी जर तुम्ही जिम जॉईन केली असेल तर तुम्ही फिट राहण्यासाठी बॉडी ट्रेनिंग जसे की, स्क्वॉट्स किंवा फ्लेक्ससारखे एक्सरसाईज नक्कीच करू शकता. त्याचबरोबर 14 ते 17 वर्षांच्या मुलांना फिट राहण्यासाठी तुम्ही जॉगिंग, स्किपिंग, स्विमिंग आणि सायकलिंगसारखे काही एक्सरसाईज करायला सांगू शकता. तसेच, या सर्वात योग अभ्यास देखील करणं तितकंच गरजेचं आहे. कारण शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकासही गरजेचा आहे. 


'या' गोष्टींची काळजी घ्या 



  • उत्साहात सुरुवातीलाच जास्त व्यायाम करू नका. तर, हळूहळू व्यायामाला तुमच्या रूटीनचा भाग बनवा. 

  • सुरुवातीलाच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी काही सोपे एक्सरसाईज करा.

  • एक्सरसाईज करताना योग्य ट्रेनरच्या देखरेखीखाली केलात तर जास्त फायदेशीर ठरेल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Hair Care : लांब, सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? पाण्यात फक्त 'या' गोष्टी मिसळून वापरा; सर्व समस्यांपासून सुटका