Home Remedy for Strong and Shiny Hair : वारंवार केस (Hair) धुतल्याने कोरडे आणि निर्जीव होतात. थंडीत (Winter) केसांची जास्त काळजी घ्यावी लागते, कारण थंड वातावरणामुळे (Cold Weather) केसांची चमक गायब होते आणि केस सहज ड्राय होतात. तर काही जणांचे केस धुतल्यानंतर फक्त 1-2 दिवसांनी तेलकट दिसू लागते. अशा वेळी केसांची निगा राखण्यासाठी नेमकं काय करावं हा प्रश्न पडतो. काही जण बाजारातील उत्पादने किंवा पार्लरमधील महागड्या स्पा किंवा हेअर ट्रिटमेंट घेतात. प्रत्येकाला हे शक्य नसतं किंवा तेवढा वेळही नसतो. मग केसांच्या आरोग्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोपे पर्याय (Home Remedy) वापरू शकता. यामुळे तुमच्या केसांसंबंधित सर्व समस्या दूर होऊन केस मऊ आणि लांब होतील. 


लांब, सुंदर आणि चमकदार केस हवेत?


सुंदर, लांब आणि चमकदार केसांसाठी तुम्हाला बाजारातील महागडे प्रोडक्ट्स किंवा पार्लर ट्रिटमेंटची गरज नाही. तुम्ही फक्त पाण्यात काही गोष्टी मिसळून त्याचा केसावर वापर केल्याने तुमच्या केसासंबंधित सर्व समस्या दूर होतील.  


कॉफी (Coffee For Hair)


केसांना मॉइश्चरायझ करण्यात कॉफी खूप परिणामकारक आहे. एका छोट्या वाटीत किंवा भांड्यात पाणी घ्या आणि त्यात कॉफी पाण्यात मिसळा. ग्राउंड कॉफी म्हणजे कॉफीची बारीक पूड वापरा, ज्यामुळे कॉफी सहज पाण्यात विरघळेल. तुम्ही अर्धा कप कोमट पाण्यात कॉफी पूड मिसळून त्यानंतर हे यामध्ये साधं पाणी मिसळू शकता, यामुळे कॉफी पाण्यात सहज मिसळेल. यामुळे कॉफीचे कण केसांमध्ये अडकणार नाहीत. शॉम्पूनंतर या कॉफीच्या पाण्याने केस धुवा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या. 15 मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर तुमच्या केसांचा छान चमक येईल.


मध (Honey)


केस चमकदार करण्यासाठी पाण्यात मध मिसळा. एक मग पाण्यात तीन ते चार चमचे मध टाका. या पाण्याने केस धुवा आणि 5 ते 10 मिनिटे राहू द्या. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने केस चांगले धुवा. मधाचा वापर केल्याने केस मऊ होऊन चमकदार होतील.


कडुलिंब (Neem)


कोरड्या टाळूपासून किंवा कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंब खूप फायदेशीर आहे.  कडुलिंबाची पाने गरम पाण्यात काही वेळ उकळू द्या, हे पाणी नंतर थंड करा. या पाण्याने केस धुवा, यानंतर 20 मिनिटे हे असं राहू द्या. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.


ॲपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)


टाळूवर साचलेल्या घाणीमुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. केसांची ही समस्या दूर करण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरेल. एक कप पाण्यात ॲपल सायडर व्हिनेगरच्या दोन ते तीन चमचे मिसळा. शॅम्पू केल्यानंतर या पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा तुम्ही हे करु शकता. यामुळे केस मजबूत होऊन चमकदारही होतील.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Weight Loss : 7 दिवसात वजन कमी करा! पोटावरील चरबी कमी करण्यासाठी गहूऐवजी 'या' धान्याची चपाती खा