Fitness Tips : जेव्हा आपण व्यायामाला सुरुवात करतो, एखादा नवीन व्यायाम (Excercise) करतो तेव्हा आपले हात-पाय म्हणजेच स्नायू (Muscle) पूर्णपणे दुखतात हे अत्यंत स्वाभाविक आहे. मग हा व्यायाम धावणे, सायकलिंग किंवा वेट ट्रेनिंग कोणताही असो आपले स्नायू दुखतात. याचं कारण आपल्या मनाची तयारी नसणे. उदाहरणार्थ, आपण पहिल्यांदाच वेट ट्रेनिंग सुरु केल्यास आपले स्नायू जड वजन उचलण्यासाठी पूर्णपणे तयार नसतात. असे केल्याने अचानक दबाव आणि ताण येतो, ज्यामुळे स्नायू दुखतात, सूज येते आणि वेदना होतात. पण काळजी करण्याच ीगरज नाही. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळेल.
स्ट्रेच करा
व्यायाम केल्यानंतर स्ट्रेच करणं फार महत्वाचं आहे. स्ट्रेचिंगमुळे स्नायू सैल होतात आणि ताण कमी होतो. खरंतर, जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपले स्नायू आकुंचन पावतात. ताणून ते त्यांच्या मूळ स्थितीत परत येतात. या व्यतिरिक्त, ते स्नायूंमध्ये रक्त परिसंचरण देखील सुधारते. कोणत्याही प्रकारच्या व्यायामानंतर, तुम्ही 5-10 मिनिटे स्ट्रेचिंग करा. यामुळे स्नायू दुखणे आणि थकवा कमी होईल.
वॉर्म अप करा
व्यायाम केल्यानंतर स्नायूंना उबदार ठेवल्याने खूप आराम मिळतो. गरम पाण्याने अंघोळ केल्याने स्नायूंना आराम मिळतो. खरंतर, उष्णतेमुळे रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात. याशिवाय, उष्णतेमुळे स्नायूंचा ताण कमी होतो, ज्यामुळे त्यांच्यातील ताण किंवा घट्टपणाची समस्या दूर होते. म्हणून, जर व्यायामानंतर तुमचे स्नायू दुखत असतील, तर 15-20 मिनिटे गरम पॅक लावा किंवा कोमट पाण्याने आंघोळ करा. तुम्हाला तात्काळ आराम मिळेल.
मसाज करा
जेव्हा आपण व्यायाम करतो, तेव्हा आपले स्नायू ताणले जातात. स्नायूंना मसाज केल्याने त्यांच्यातील तणाव कमी होतो. तसेच, मसाजमुळे पोषक आणि ऑक्सिजन सहज मिळण्यास मदत होते, ज्यामुळे स्नायूंचं दुखणं कमी होते. त्यामुळे व्यायामानंतर स्नायूंमध्ये दुखत असेल तर त्या स्नायूंना 10-15 मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. पण मसाज करताना जास्त दाब देऊ नका.
भरपूर पाणी प्या
व्यायाम केल्यानंतर पुरेसे पाणी पिणं फार महत्वाचं आहे. पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. जेव्हा आपण व्यायाम करतो, तेव्हा आपल्या शरीराला घाम येतो ज्यामुळे शरीरातून पाणी बाहेर पडते. पाण्याच्या कमतरतेमुळे स्नायू कडक आणि ताणल्यासारखे वाटतात. म्हणूनच, व्यायामानंतर पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर रिहायड्रेट होते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या