Realme 12 Series Pro :रियलमीने भारतात आपली लेटेस्ट Realme 12 Pro सीरीज लॉंच करण्याची घोषणा केली आहे. या फोनमध्ये दोन पेरिस्कोप लेन्स मिळणार असल्याने या फोनची अनेकजण वाट बघत आहेत. फोन लाँच झाल्यावर फ्लिपकार्टवर ऑफर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही फोन घेण्याचा विचार करत असाल तर काही दिवस थांबून हा फोन नक्की खरेदी करु शकता. काय आहेत या फोनचे फिचर्स पाहूयात...


 


रियलमीने पोस्ट केला टिझर


Realme India च्या एक्सवर एक टीझर पोस्ट केला आहे. त्यात फोनसंदर्भात थोडीफार माहिती समोर आली आहे. Realme 12 Pro सीरीज भारतात जानेवारीमध्ये लॉंच होत आहे. कंपनीने आतापर्यंत लाँचची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही आणि युजर्सना लॉंच तारखेचा अंदाज घेण्यास सांगितले आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन 200MP आणि पेरिस्कोप कॅमेऱ्यासह भारतात जानेवारीमध्येच लॉंच केला जाईल. 


Realme 12 सीरीजमधील फिचर्स: 


• मागील वर्षी जून 2023 मध्ये लाँच झालेल्या Realme 11 सीरीजची ही अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे.


• रियलमीने अजून आपल्या येणाऱ्या नवीन डिव्हाईसचं नाव घोषित केलेले नाही.


• फ्लिपकार्टवर रिलीझ केलेल्या मायक्रो-साइटच्या URL मध्ये Realme 12 Series लिहिली गेली होती. ज्यामुळे या फोन सीरिजच्या लॉंचचा अंदाज बांधला जात होता.


• या फोनमध्ये 200MP कॅमेरासह पेरिस्कोप लेन्स असेल.


• या नवीन स्मार्टफोन सीरीजसह, रियलमी भारतात नुकत्याच लॉंच झालेल्या Xiaomi च्या Redmi Note 13 सीरिजशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करेल.


•  Redmi ने 4 जानेवारी 2024 रोजी भारतीय बाजारात 200MP कॅमेरा असलेली Redmi Note 13 Pro सीरीज लॉंच केली आहे.


• रियलमी हा आपल्या  Realme 12 सीरिजमध्ये Realme 12, Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ यासह तीन स्मार्टफोन लॉंच करू शकतो. या सीरीजमध्ये प्रो आणि प्रो प्लस मॉडेल्समध्ये पेरिस्कोप लेन्स असू शकतात.


• Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ TENAA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसले.


• TENAA नुसार, Pro आणि Pro Plus मध्ये फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह 6.7-इंच AMOLED डिस्प्ले असू शकतो.


• लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Realme 12 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 आणि Realme 12 Pro+ मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 SoC चिपसेट असू शकतो.


• Pro Plus मध्ये 64MP पेरिस्कोप लेन्स असू शकते, जे 3X झूम ऑप्टिकल सपोर्टसह येऊ शकते. त्याच वेळी, Realme 12 Pro मध्ये 32MP पेरिस्कोप लेन्स असू शकतो, जो 2X झूम सपोर्टसह येऊ शकतो.


• याशिवाय, हे दोन्ही फोन 50MP प्राइमरी बॅक कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स दिले जाऊ शकतात.