Fitness Tips : निरोगी राहण्यासाठी शरीराला योग्य आहार आणि व्यायामाची (Excercise) गरज आहे. आपल्यापैकी अनेकजण फिट राहण्यासाठी व्यायाम देखील करतात. पण, अनेकदा असा प्रश्न पडतो की, फिट राहण्यासाठी वर्कआऊट (Workout) नेमका किती वेळ करावा? खरंतर, व्यायामाचं एक पॅरामीटर ठरलेलं असतं. त्या वेळेत जर तुम्ही व्यायाम केलात तर तुम्हाला जास्त चांगले फायदे मिळू शकतात. काही लोक ध्येय ठरवून वर्कआऊट करतात. तर काही लोक फक्त फिट राहण्यासाठी वर्कआऊट करतात. पण, असं जरी असलं तरी कोणत्याही गोष्टीचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही त्याचं योग्य प्रमाण ठरवता. कारण, तुम्ही जर जास्त व्यायाम केला तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या व्यायामाच्या वेळेवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. 


वर्कआऊट करण्यासाठी लोकांची अनेक कारणं असतात. ज्यावर वर्कआऊटची वेळ अवलंबून असते. तुम्ही किती वेळ वर्कआउट करून फिट राहता हे जास्त गरजेचं आहे. 


1. वर्कआऊटची वेळ ठरवा 


तुम्ही किती वेळ व्यायाम करता यावर तुमचं आरोग्य आणि तुमचा फिटनेस ठरलेला असतो. तुम्ही ठरवलेल्या ध्येयानुसार तुमच्या वर्कआऊटची वेळ ठरवा. तुम्हाला वजन कमी करायचं आहे की तुमचे हृदय निरोगी ठेवायचे आहे यावर वर्कआउटची वेळ अवलंबून असते.


2. वर्कआऊट करा 


तुम्हाला किती वेळ वर्कआऊट करावा लागेल हे तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यायाम करत आहात यावर अवलंबून आहे. जर तुमचा व्यायाम सोपा असेल तर तुम्ही बराच वेळ तो करू शकता. पण, जर तुम्ही फार कठीण व्यायाम करत असाल तर तो ठराविक वेळेसाठीच करा. जास्त वेळ फार कठीण व्यायाम केल्याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं.


3. तुम्ही दररोज किती वेळ व्यायाम करू शकता?


तुम्ही दररोज किती वेळ व्यायाम करू शकता याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. रोज एक तासंच व्यायामाला देता येईल असंही नाहीये. यासाठी नियमित व्यायामासाठी दिवसातून एक निश्चित वेळ ठरवा.  


4. शरीराकडे लक्ष द्या


जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. शरीराच्या फ्लेक्सिबिलिटी नुसार व्यायाम करा. अन्यथा तुम्ही आजारी पडू शकता. 


5. विश्रांती घ्या 


व्यायाम करणं आरोग्यासाठी चांगलं आहे पण त्याबरोबरच शरीराला विश्रांती देणंही गरजेचं असतं. जास्त वर्कआऊट केल्याने तुम्हाला त्याचे फायदे कधीच मिळणार नाहीत उलट तुमचं जास्त नुकसान होऊ शकतं. त्यामुळे वर्कआऊटच्या दरम्यान थोडी विश्रांतीही घ्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' 7 लोकांच्या आहारात माशांचा समावेश नक्की असावा; हाडांच्या तंदुरुस्तीसह अनेक आजारही होतील दूर