Fashion : गोवा हे असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला तुमच्या कपड्यांची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. येथे अनेक समुद्रकिनारे आहेत. अशा स्थितीत तुम्ही कोणतेही जड कपडे घालून समुद्रकिनाऱ्यावर जाऊ शकत नाही. मुलं फक्त शॉर्ट्स आणि टी-शर्ट वेअर करतात, परंतु मुलींना स्टायलिश बीच लूक कॅरी करणे खूप कठीण होते. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींचे लूक दाखवणार आहोत, ज्यांच्याकडून तुम्ही गोव्याला जाण्यासाठी शॉपिंग करताना टिप्स घेऊ शकता.


 




स्लिट स्कर्ट आणि ब्रॅलेट स्टाइल टॉप


समुद्रकिनाऱ्यावर ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही क्रिस्टल डिसूझाच्या लूकवरून टिप्स घेऊ शकता. या प्रकारचे स्लिट स्कर्ट आणि ब्रॅलेट स्टाइल टॉप तुमच्या लुकमध्ये भर घालतील.




क्यूट शॉर्ट ड्रेस


जर तुम्हाला क्यूट दिसायचे असेल तर तुम्ही या लुक्सवर एक नजर टाकू शकता. यासाठी तुम्हाला फक्त अशा क्यूट शॉर्ट ड्रेसची आवश्यकता असेल. अशा ड्रेससोबत पायात चप्पल आणि डोक्यावर टोपी घालायला विसरू नका.




टॉप आणि डेनिम शॉर्ट्स


बऱ्याच मुलींना शॉर्ट्स कॅरी करायला आवडतात कारण ते खूप आरामदायक असते. अशा परिस्थितीत या लूकमधून टिप्स घेऊन तुम्ही क्युट टॉप आणि डेनिम शॉर्ट्स कॅरी करू शकता.




वन शोल्डर टॉप आणि फ्लोरल प्रिंट स्कर्ट


असा वन शोल्डर टॉप आणि फ्लोरल प्रिंट स्लिट स्कर्ट तुम्हाला सुंदर दिसण्यास मदत करेल. यासोबत तुम्ही तुमच्या डोळ्यांवर चष्मा लावलात तर तुमची स्टाइल हॉट दिसेल.




मिनी स्कर्ट आणि पांढरा शर्ट


जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत गोव्याला जात असाल तर असे आउटफिट्स तुमच्यासोबत नक्कीच घ्या. शॉर्ट ड्रेसशिवाय लाल रंगाचा मिनी स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट तुम्हाला ग्लॅमरस दिसण्यास मदत करेल.




बॉडीकॉन ड्रेस


जर तुम्हाला बॉडीकॉनचा ड्रेस घालायला आवडत असेल तर तुम्ही हलक्या फॅब्रिकचा बॉडीकॉन कॅरी करू शकता. यासोबतच केस मोकळे ठेवा आणि मेकअपची विशेष काळजी घ्या.


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Fashion : आता पोटाची चरबी लपेल क्षणात, स्लिम दिसाल..! 'या' ट्राऊझर्स एकदा ट्राय करा अन् कमाल बघा..