Fashion : बदलत्या फॅशननुसार त्याचे ट्रेंडही बदलत चाललेत. नव्या ट्रेंडनुसार मार्केटमध्ये विविध कपडे येत आहेत. नवनवीन फॅशनचे कपडे घालायला कोणाला आवडत नाही. फक्त प्रश्न येतो इथे तो म्हणजे, वाढत्या वजनाचा..! आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत. कारण या व्यस्त जीवनात वेळ कोणालाच नाही. त्यामुळे लोकांचे वजन वाढू लागते. असे अनेक लोक आहेत ज्यांच्या पोटाची चरबी स्पष्टपणे दिसून येते. अशा परिस्थितीत आपण बरेच कपडे घालणे बंद करतो. ज्यामुळे आपण आपले अनेक आवडते कपडे घालण्यास विचार करतो. याचे कारण असे की आपल्याला वाटते की आपल्या पोटाची चरबी त्यातून दिसते. मात्र आता पोटाची चरबी अशा लपली जाईल.. कारण वाढलेले वजन लपविण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या ट्राऊझर घालू शकता.



योग्य डिझाईनची ट्राऊझर घाला..


ट्राऊझर घातल्यानंतर पोटाची चरबी वरून दिसून येईल असे आपल्याला वाटते. पण तसे नाही, जर तुम्ही योग्य डिझाईनची ट्राऊझर घातली तर तुमचा लुक चांगला दिसेल. तुम्ही कोणत्या प्रकारची ट्राऊझर घालू शकता, जाणून घ्या..




प्लीटेड ट्राउझर्स - अत्यंत आरामदायी!


प्लीटेड ट्राउझर्स घालण्यास अतिशय आरामदायक असतात. अनेकदा असं होतं की ते घातल्यानंतर तुमचा लूक फॉर्मल दिसतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पोटाची चरबी लपविण्यासाठी ते घालू शकता. यामध्ये तुम्हाला स्ट्रेचेबल ट्राउझर्स मिळतात, जे पोटाची चरबी लपवू शकतात. तसेच, जेव्हा तुम्ही तो शर्ट किंवा टॉपसोबत घालता तेव्हा तुमचा लठ्ठपणा दिसून येत नाही. तुम्हाला अशा प्रकारचे ट्राउझर्स वेगवेगळ्या रंगात मिळतील. जे तुम्ही बाजारातून 250 ते 500 रुपयांना खरेदी करू शकता.




स्ट्रेचेबल वेस्ट इलास्टीक ट्राउझर्स 


जर तुम्हाला ट्राउझर्स घातल्यानंतर आरामात राहायचे असेल तर तुम्ही स्ट्रेचेबल वेस्ट इलास्टीक असलेली ट्राउझर्स  खरेदी करू शकता. तुम्हाला पँट स्टाईलमध्ये अशा प्रकारचे ट्राउझर्स मिळतील. तसेच, ट्राउझर्सच्या तळाशी एक यूनिक डिझाईन असेल, ज्यामुळे ते फॅन्सी दिसेल. त्यात स्ट्रेचेबल असल्याने ही पॅंट घालणे सोपे जाईल. तुमचे पोटही दाबलेले राहील. अशा स्थितीत तुम्ही कोणतीही कुर्ती किंवा त्यावर टॉप घातल्यास तुम्ही लठ्ठ दिसणार नाही. कॉटन, रेयॉन आणि डेनिमची अशी ट्राउझर्स बाजारात 200 ते 500 रुपयांना मिळतील.




मिड वेस्ट ट्राउझर


मुलींना अनेकदा हाय वेस्ट असलेली ट्राउझर घालायला आवडते. पण यावेळी, पोटाची चरबी लपविण्यासाठी मिड वेस्ट ट्राउझर स्टाईल करा. कारण यामुळे तुमच्या पोटाची चरबी सहज लपते आणि तुम्ही जाड दिसणार नाही. अशी ट्राउझर्स घातल्यानंतर तुम्ही त्यात क्रॉप टॉप स्टाइल करू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास टी-शर्ट टॉप ट्राउझर्सच्या आत दाबूनही स्टाइल करू शकता. तुम्हाला या प्रकारचे ट्राउझर्स फॉर्मल पॅटर्नमध्ये मिळतील. तसेच रंग काळा, निळा, ऑफ व्हाईट आणि व्हाईट मध्ये देखील उपलब्ध असेल. जर तुम्ही अशा प्रकारच्या ट्राउझर  स्टाईल केल्या तर तुमच्या पोटाची चरबी दिसणार नाही. तसेच, तुम्ही ते ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही विशेष कार्यक्रमात डिझायनर टॉपसह घालू शकाल. ट्राउझर घातल्यानंतर कोणता रंग आणि डिझाईन चांगली दिसेल हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवावे लागेल.


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Fashion : स्लिम अनं स्टायलिश दिसायचंय? तर 'अशा' प्रकारचे जॅकेट मॅक्सी ड्रेस ट्राय करा, कमाल बघा..