Fashion : उन्हाळ्यात (Summer) लग्न असेल तर कपडे कोणत्या प्रकारचे घालायचे हा विचार महिला करतात. कारण लग्न म्हटलं तर हेवी ड्रेसेस, आणि साड्या आल्या, आणि भर उन्हाळ्यात ते वेअर करणं म्हणजे नकोसं होतं. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना लग्नात साडी नेसायला आवडते पण अशा खास प्रसंगी कोणत्या प्रकारची साडी नेसायची हे त्यांना समजत नाही. त्यामुळे अनेक वेळा ते लेहेंगा निवडतात, पण जर तुम्हाला उन्हाळ्यात भारी लेहेंग्याऐवजी साडी नेसायची असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की परफेक्ट साडी (Saree) कशी निवडू शकता? या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही साड्या दाखवणार आहोत ज्या तुम्ही लग्नात घालू शकता.


 




घरचोला बांधणी साडी


लग्नात स्टाईलिश दिसायचंय आणि हेवी कपडे नको, मग या खास प्रसंगी तुम्ही लेहेंग्याऐवजी अशा प्रकारची साडी घालू शकता. यासाठी तुम्ही फोटोत दाखवलेल्या साडीच्या लूकवरून कल्पना घेऊ शकता. या फोटोत एक सुंदर घरचोला बांधणी साडी आहे. या साडीवर गोल्डन एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. याशिवाय या साडीच्या बॉर्डर आणि पल्लूवरही गोल्डन वर्क करण्यात आले आहे. लग्नासारख्या खास प्रसंगी परिधान करणे हा एक योग्य पर्याय असू शकतो. या प्रकारची साडी तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता.


 




Organza सिल्क साडी



आजकाल ऑर्गेन्झा साडी महिलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या प्रकारची ऑर्गेन्झा सिल्क साडी हेवी लेहंगा ऐवजी लग्नातही घातली जाऊ शकते. ही साडी कशी कॅरी करायची यासाठी तुम्ही फोटोत दाखवलेल्या साडीच्या लूकवरून कल्पना घेऊ शकता. फोटोत दाखवल्या प्रमाणे लव्हेंडर रंगाची ऑर्गेन्झा सिल्क साडी परिधान केली आहे. या साडीवर एम्ब्रॉयडरी आणि सिक्विन वर्क आहे. या साडीसोबत न्यूड मेकअप शेड ॲक्सेसरीज कॅरी केल्या तर उत्तमच. तुम्ही या प्रकारची साडी सहज परिधान करू शकता. तुम्हाला या साड्या बाजारात अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये सहज मिळतील.


 




नेट साडी



नेट सांडीत तर आजकाल विविध पॅटर्न महिलांचे मन मोहून घेत आहेत. ही साडी लग्नासारख्या प्रसंगी परिधान करण्यासाठी देखील सर्वोत्तम पर्याय असू शकते, फोटोत दाखवल्या प्रमाणे अशा प्रकारची साडी नेसली आहे. ही साडी नेट आणि सिल्व्हर एम्ब्रॉयडरीमध्ये बनवली आहे आणि त्यामुळे ही साडी खूप सुंदर आहे. या प्रकारची साडी तुम्ही लग्नातही घालू शकता. ही साडी तुम्हाला अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये सहज मिळेल. या प्रकारची साडी तुम्ही बाजार आणि इतर ठिकाणांहून स्वस्त दरात खरेदी करू शकता.


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Fashion : एक तर उन्हाळा, त्यात लग्नाचा सीझन, 'Dont Worry!' कूल दिसण्यासाठी लेहेंग्याच्या डिझाईन्स एकदा पाहाच...