Marathi Actress post on Kangana Ranaut : 'लोकसभा निवडणुकां'चं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आणि अनेक नावांच्या चर्चा जोर धरु लागल्या. यामध्ये काही नावं अपेक्षित होती ज्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut), रामायणातील भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) यांना भाजपकडून लोकसभा निवडणुकांसाठी तिकीट देण्यात आलं आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातून तर अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी मिळाली. दरम्यान कंगनाच्या उमेदवारीनंतर बरीच चर्चा होत आहे. त्यातच एका मराठी अभिनेत्रीनं कंगनाच्या समर्थनार्थ पोस्ट करत तिचं अभिनंदन केलं असून तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 


शनिवार 23 मार्च रोजी भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अभिनेत्री कंगना रानौत हिला हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदासंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून कंगना लोकसभा निवडणुकांमध्ये उतरणार असल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच तिच्या सोशल मीडियाच्या पोस्ट, राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला लावलेली हजेरी या सगळ्यामुळे ती राजकारणात एन्ट्री करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. 


मराठी अभिनेत्रीची कंगनाच्या समर्थनार्थ पोस्ट


बिग बॉसच्या घरातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मेघा धाडे हिने काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तिने आता कंगनाचं अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. विजयीभव: असं म्हणत मेघानं कंगनाच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. सध्या मेघाच्या या पोस्टनं साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. 


उमेदवारी मिळाल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया


लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर कंगनाने पोस्ट करत पक्षाचे आभार मानले. तिने म्हटलं की,  'माझा प्रिय भारत देश आणि भारतातील जनतेचा स्वतःचा पक्ष भारतीय जनता पक्षाने मला नेहमीच बिनशर्त समर्थन दिलं आहे. पाठिंबा दिला आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझ्या जन्मस्थानावरून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मी मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या हायकमांडच्या निर्णयाचे स्वागत करते. आज मी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला आहे. याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. मी योग्य कार्यकर्ता आणि विश्वासार्ह लोकसेवक होण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.'


ही बातमी वाचा : 


Kangana Ranaut in Lok Sabha Election : 'भारतातील जनतेचा स्वत:चा पक्ष...', तिकीट मिळाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, जन्मभूमीतूनच उमेदवारी दिल्यानं पक्षाचे मानले आभार