चेन्नई : ऋतुराज गायकवाड (Rururaj Gaikwad) याच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) आयपीएलमध्ये (IPL 2024) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. ही आयपीएलमधील सातवी मॅच होती. दुसऱ्या विजयासह चेन्नई सुपर किंग्जची टीम गुणतालिकेत टॉपला पोहोचली आहे. ऋतुराज गायकवाडनं गुजरातवरील विजयानंतर बोलताना ज्या प्रमाणं टीम कामगिरी करत आहे त्यामुळं उत्साहित झालो असून गुजरात विरुद्ध अशाच कामगिरीची गरज होती, असं ऋतुराज गायकवाड म्हणाला.


गुजरात टायटन्सनं टॉस जिंकून चेन्नईला प्रथम बॅटिंगसाठी बोलावलं होतं. चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 विकेटवर  206 धावा केल्या होत्या. चेन्नईच्या डावाची सुरुवात राचीन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाडनं केली. राचीन रवींद्रनं 46 आणि ऋतुराजनं 46 धावा केल्या. यानंतर शिवम दुबेनं आक्रमक फलंदाजी केली. शिवम दुबेनं (Shivam Dube)  23 बॉलमध्ये 51 धावा केल्या. शिवम दुबेनं 5 सिक्स आणि 2 चौकार मारले. चेन्नईनं गुजरात टायटन्सवर 63 धावांनी विजय मिळवला. शिवम दुबेला त्याच्या या वादळी खेळीबाबत प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 


शिवम दुबेच्या बॅटिंगचं धोनी कनेक्शन ऋतुराजनं सांगितलं


ऋतुराज गायकवाडनं राचीन रवींद्रनं डावाची सुरुवात करताना केलेल्या आक्रमक फलंदाजीनं गुजरात टायटन्सच्या हातून मॅच हिरावून घेतली असं म्हटलं. ऋतुराजनं नक्कीच गुजरात सारख्या टीम विरोधात बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डींगच्या बाबतीत आजची मॅच परफेक्ट होती, असं म्हटलं. चेन्नईसारख्या टीममध्ये खेळपट्टी कशी असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही, असं ऋतुराज गायकवाड म्हणाला. चेपॉकवर तुमच्या हातात शेवटपर्यंत विकेट असतील तर त्याचा तुम्हाला फायदा होतो, असं ऋतुराज गायकवाड म्हणाला. 


ऋतुराज गायकवाडनं 23 बॉलमध्ये केलेल्या 51 धावांच्या खेळीबद्दल मत मांडलं.महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जच्या मॅनेजमेंटनं शिवम दुबेसोबत चर्चा केली. माही भाईनं त्याच्यासोबत चर्चा केली आणि त्याचा आत्मविश्वास वाढलाय. शिवम दुबेला त्याची भूमिका नेमकी माहिती आहे. दुबेच्या खेळीचा आम्हाला फायदा झाला, त्याची फिल्डींग देखील  चांगली असल्याचं ऋतुराज गायकवाड म्हणाला. 


चेन्नई सुपर किंग्जनं आतापर्यंत दोन मॅचमध्ये विजय मिळवला असून गुणतालिकेत ते टॉपवर आहेत. चेन्नई सुपर किंग्जची पुढील मॅच 31 मार्चला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्स विरुद्ध लीग स्टेजमध्ये पहिला विजय मिळवला आहे. यापूर्वी चेन्नईला 2022 आणि 2023 च्या आयपीएलमध्ये लीग स्टेजमध्ये गुजरात विरुद्ध विजय मिळवता आला नव्हता. 


संबंधित बातम्या : 


Ajinkya Rahane: अजिंक्यनं हनुमान उडी मारत घेतला अफलातून कॅच, गुजरातच्या डेव्हिड मिलरचा कार्यक्रम,पाहा व्हिडीओ


Vintage Dhoni : असा झेल होणे नाही, धोनीनं हवेत सूर मारत घेतला अविश्वसनीय झेल!